MS Dhoni Last IPL Game CSK : पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघासाठी आयपीएल 2026 हंगाम जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. लीग स्टेजमधील सीएसकेचे आता फक्त दोन सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचल्यास आणखी सामने खेळण्याची संधी मिळू शकते, मात्र सध्याची गुणतालिका आणि संघाची कामगिरी पाहता टॉप-4 मध्ये पोहोचणं चेन्नईसाठी अत्यंत कठीण मानलं जात आहे.

Continues below advertisement

या हंगामात सीएसकेची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यातच चाहत्यांची सर्वात मोठी नाराजी म्हणजे एम.एस. धोनी याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. काही रिपोर्ट्सनुसार धोनी दोन सामने आधीच फिट झाला होता, पण संघाच्या कॉम्बिनेशनमुळे त्याला मैदानात उतरवण्यात आलं नाही. आता मात्र अशी चर्चा रंगली आहे की, 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात धोनी शेवटचा आयपीएल सामना खेळताना दिसू शकतात.

धोनीने यापूर्वी एका मुलाखतीत आपली इच्छा व्यक्त केली होती की, “माझा शेवटचा आयपीएल सामना चेन्नईत व्हावा.” यंदाच्या हंगामात चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियम अर्थात चेपॉक मैदानावर सीएसकेचा हा अखेरचा सामना असणार आहे. 44 वर्षीय धोनी काफ इंज्युरीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर होता, पण आता तो पूर्णपणे फिट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण ठरू शकतो.

Continues below advertisement

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही धोनीच्या पुनरागमनाबाबत मोठं विधान केलं आहे. क्रिकबजवरील चर्चेदरम्यान ते म्हणाले, “चेन्नईत फक्त एकच सामना बाकी आहे. 18 तारखेला संपूर्ण शहर पिवळ्या रंगात रंगलेलं दिसलं तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. आणि धोनी मैदानात उतरले, तरी तेही आश्चर्यकारक ठरणार नाही. तो एखाद्या हिचकॉकियन सरप्राइजसारखा क्षण असेल.” धोनीसाठी लखनऊला जाण्याचं तिकीट बुक करण्यात आलं होतं, पण ते संघासोबत गेला नाहीत. त्यामुळे आता चेपॉकवर ते अखेरचा सामना खेळण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

दरम्यान, सीएसकेच्या प्लेऑफच्या आशा अजून जिवंत असल्या तरी समीकरणं खूप कठीण आहेत. चेन्नईला उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यानंतर संघाच्या खात्यात 16 गुण होतील, पण नेट रनरेटही चांगला ठेवावा लागेल. याशिवाय इतर संघांच्या निकालांवरही सीएसकेचं भवितव्य अवलंबून असेल. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ 16 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतात.

हे ही वाचा -

IPL मध्ये मोठा ट्विस्ट, ज्या आरसीबीला आयुष्यभर ट्रोल केलं, त्यांच्याच विजयासाठी सीएसकेचे चाहते देव पाण्यात बुडवून बसले, चक्रावून टाकणारं समीकरण