Ranji Trophy Final: मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनलच्या चौथ्या दिवशी पावसामुळं खेळ थांबवण्यात आलाय. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात पावसामुळं टी ब्रेक घेण्यात आला. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं 374 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या मध्य प्रदेशच्या संघानं पहिल्या डावात 9 विकेट्स गमावून 155 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या सरांश जैन (51 धावा) आणि गौरव यादव शून्यावर खेळत आहे.
मध्य प्रदेशच्या तीन फलंदाजांचं शतकरणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध मुंबईच्या तीन फलंदाजांनी शतक झळकावलंय. यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी मध्य प्रदेशच्या संघाला धावांची आवश्यकता असताना शतक झळकावलंय. यश दुबेनं 133, शुभम शर्मानं 116 आणि रजत पाटीदारनं 122 धावांचं योगदान दिलंय. मुंबईकडून शाम्स मुलानीनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर तुषार देशपांडेनं तीन आणि मोहित अवस्थीला दोन विकेट्स मिळाले आहेत.
ट्वीट-
नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम फलंदाजीचा निर्णयरणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. कर्णधार पृथ्वी शॉचं अर्धशतक हुकलं. दरम्यान, मुंबईच्या संघानं पहिल्या डावात 374 धावा केल्या. मुंबईकडून सर्फराजनं 134 धावा केल्या. तर, सलामीवीर यशस्वी जैस्वालनं संघासाठी 78 धावांचं योगदान दिलं.
हे देखील वाचा-