Mohammed Siraj Complete 50 ODI Wicket : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज याने आक ओकणारी गोलंदाजी केली. सिराजच्या माऱ्यापुढे श्रीलंकेचा डाव अवघ्या ५० धावांत आटोपला. सिराज याने आपल्या दुसऱ्या षटकात चार विकेट घेतल्या.  त्यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये 50 विकेट घेण्याचा पराक्रमकही केला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूमध्ये सर्वात वेगवान विकेट घेणारा सिराज भारताचा पहिला तर जगातील दुसरा गोलंदाज ठरलाय. 


सिराजला चरित असालंकाच्या रूपाने वनडेतील 50वी विकेट मिळाली. मोहम्मद सिराजने वनडे फॉरमॅटमध्ये 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 1002 चेंडूंचा प्रवास केला. वनडेमध्ये सर्वात कमी चेंडूत ५० विकेट घेणारा सिराज भारताचा पहिला गोलंदाज तर जगातील दुसरा गोलंदाज ठरलाय. श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने  अवघ्या 847 चेंडूत 50 एकदिवसीय विकेट पूर्ण केल्या होत्या. 


आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद सिराजने गोलंदाजीत अनेक विक्रम केले. तो आता 1 षटकात 4 बळी घेण्याचा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात सिराजने 7 षटकात केवळ 21 धावा देत 6 बळी घेतले. 2002 नंतर प्रथमच एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराज पहिल्या 10 षटकात 5 बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2003 मध्ये जवागल श्रीनाथने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्या 10 षटकात 4 विकेट घेतल्या होत्या, 2013 मध्ये भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेविरुद्ध आणि 2022 मध्ये जसप्रीत बुमराहने 4 विकेट घेतल्या होत्या.