Mohammed Shami Returns Ranji Trophy नवी दिल्ली: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मोहम्मद शमीनं 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मोहम्मद शमीचं मैदानावर लवकरच कमबॅक होईल. सध्या सुरु असलेल्या रणजी स्पर्धेत मोहम्मद शमी बंगालकडून दोन मॅच खेळू शकतो. त्या मॅचमधील शमीच्या कामगिरीच्या जोरावर त्याला आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तयारीसाठी संधी मिळेल, अशी शक्यता आहे.
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार बंगालच्या टीमचे कोच लक्ष्मी रतन शुक्ला यांनी सांगितलं की "शमी केरळ विरुद्ध होणाऱ्या मॅचसाठी उपलब्ध असणार नाही. मात्र, आमच्या अपेक्षेनुसार तो कर्नाटक आणि मध्य प्रदेश विरुद्ध होणाऱ्या मॅचसाठी उपलब्ध असेल. बंगाल आणि कर्नाटक यांच्यातील मॅच 6 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. तर, बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश ही मॅच 13 नोव्हेंबरपासून सुरु होईल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत मोठी अपडेट
बंगालच्या टीमचे कोच लक्ष्मी रतन शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शमी भारतीय क्रिकेट टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचं योगदान महत्त्वाचं असेल. मोहम्मद शमीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी बंगालकडून रणजी ट्रॉफीतील दोन मॅच खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. रणजी स्पर्धेत मोहम्मद शमीनं चांगली कामगिरी केल्यास त्याचा फायदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होईल. आमचे चार खेळाडू भारत आणि भारत अ संघातून खेळतील, असं देखील शुक्ला म्हणाले.
फेब्रुवारीत शमीची सर्जरी
मोहम्मद शमी 2023 च्या वनडे वर्ल्डकप दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. लंडनमध्ये फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या गुडघ्याची सर्जरी करण्यात आली होती.नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये मोहम्मद शमीच्या कमबॅकसाठी रिकवरीची प्रक्रिया सुरु होती. मात्र, गडघ्यावर सूज असल्यानं त्याच्या कमबॅकला उशीर झाला होता. दुसरीकडे कॅप्टन रोहित शर्मानं देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इनफॉर्म असलेला मोहम्मद शमी हवा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं रणजीततील दोन सामन्यांचा शमीला फायदा होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध भारत संकटात
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. यातील पहिली कसोटी न्यूझीलंडनं जिंकली आहे. दुसरी कसोटी पुण्यात आहे. दुसऱ्या कसोटीत देखील न्यूझीलंडनं पकड मिळवली आहे. सध्या न्यूझीलंडकडे दुसऱ्या डावातील धावासंह 301 धावांची आघाडी आहे. भारताची फलंदाजी पहिल्या कसोटीतील पहिल्या डावाप्रमाणं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात देखील ढेपाळली.
इतर बातम्या :
India vs New Zealand: भारताचा डाव गडगडला; न्यूझीलंडकडे भक्कम आघाडी, मिचेल सँटनरच्या 7 विकेट्स