Mohammed Shami:  टीम इंडियाने 2019 च्या वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीतील पराभवाचे (Cricket World Cup Semi Final) उट्टे काढत न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला. भारताच्या या विजयात मोहम्मद शामीचा (Mohammed Shami) मोठा वाटा राहिला आहे. शामीने आपल्या तेज गोलंदाजीने किवींचे सात विकेट्स घेतले. शामीने आजच्या सामन्यात काही विक्रमांना गवसणी घातली. शामीने आजच्या सामन्यात 20 वर्षापूर्वींचा विक्रम मोडीत काढला. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाकडून सर्वोत्कृष्ट  गोलंदाजीची कामगिरी नोंदवली. भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम हा सहा विकेट्सचा आहे. तर, दुसरीकडे शामीने 2003 वर्ल्डकपमधील आशिष नेहराने इंग्लंडविरोधात 6 विकेट्स घेतले होते. त्याचा विक्रमही शामीने आज मोडीत काढला. 






आज, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीसह  शामी हा एकदिवसीय वर्ल्ड कपच्या इतिहासात सात बळी घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज ठरला. विश्वचषकाच्या बाद फेरीत ही कामगिरी करणारा शामी हा एकमेव गोलंदाज ठरला. 2014 मध्ये बांगलादेश विरुद्ध स्टुअर्ट बिन्नीने सहा विकेट्स घेत सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली होती. आज मात्र, शामीने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीयाकडून सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली.


 










सुपर फाइव्ह क्लबमध्ये शामी... 


शमीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सात बळी मिळवण्यासाठी केवळ पाच खेळाडूंच्या विशेष क्लबमध्ये प्रवेश केला. केवळ ग्लेन मॅकग्रा, अँडी बिचेल, टिम साउथी आणि विन्स्टन डेव्हिस यांनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सात बळी घेतले आहेत.






यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट शामीच्या नावावर 


मोहम्मद शामी यांच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज झालाय. शामी पहिल्या चार सामन्यात बेंचवर बसला होता. पण हार्दिक पांड्याला पुण्यातील सामन्यात दुखापत झाल्यानंतर शामीला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले. त्यानंतर त्याने माघारी पाहिले नाही. शामीने फक्त सहा सामन्यात 23 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यामध्ये त्याने तीन वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. तर एक वेळा चार विकेट घेतली आहे.  यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात शामी पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर एडम झम्पा आहे. त्याने 22 विकेट घेतल्या आहेत.