Mohammad Rizwan Harshit Rana IND vs PAK Champions Trophy 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामने नेहमीच ब्लॉकबस्टर ठरले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे दोन्ही संघ दुबईत एकमेकांशी भिडत आहेत. हा सामना अशा ठिकाणी खेळला जात आहे जो दोन्ही संघांसाठी तटस्थ आहे, परंतु तरीही स्टेडियम हाऊसफुल्ल आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी येत आहेत आणि यावेळीही त्यांची संख्या मोठ्या संख्येने दिसून येत आहे. दरम्यान या सामन्यात गरमागरमी पाहिला मिळत आहे. खरंतर सामन्यात कर्णधार मोहम्मद रिझवान भारतीय गोलंदाज हर्षित राणाशी भिडला.

गौतम गंभीरचा लाडका रागाने लाल

भारतीय संघाकडून हर्षित राणाने 21 वे षटक टाकले. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने एक सरळ स्ट्रोक खेळला आणि नंतर धाव घेताना त्याने भारतीय गोलंदाजाला जोरात धक्का दिला. यामुळे दोन्ही खेळाडूंचा खांद्याला खांदा धडकला. त्यानंतर हर्षितने हातवर केला आणि रिजवानला रागाने काहीतरी म्हटले. यानंतर लगेचच, कॅमेरा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर गेला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानने जिंकली नाणेफेक 

या ब्लॉकबस्टर सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि वृत्त लिहिपर्यंत, 30 षटकांत तीन गडी गमावून 154 धावा केल्या होत्या. सौद शकील 58 धावा काढून खेळत आहे आणि सलमान आगा 2 धावा काढून खेळत आहे. त्याआधी, पाकिस्तानचे स्टार फलंदाज बाबर आझम (23) आणि इमाम-उल-हक (10) आणि कर्णधार मोहम्मद रिझवान (77 चेंडूत 46) पॅव्हेलियनमध्ये परतले.

रोहित आणि शमी उष्णतेमुळे मैदानाबाहेर

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सुमारे 20 मिनिटे मैदानाबाहेर राहिल्याने भारतीय संघाला अडचणीचा सामना करावा लागला. पण, तो लवकरच मैदानात परतला आणि गोलंदाजी केली. दुबईच्या उन्हात कर्णधार रोहित शर्मालाही अस्वस्थ वाटत होता आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी शुभमन गिलने कमांड घेतली.

हे ही वाचा - 

Ind vs Pak : टीम इंडियाच्या 'बापू'चा नादच खुळा, असा थ्रो फेकला की इमाम उल हकचा खेळ खल्लास; पाकिस्तानी फॅन्सला रडू कोसळलं!