PAK vs AFG: पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात ट्राय सिरीज खेळवण्यात आली. यामध्ये सिरीजमध्ये पाकिस्तानच्या संघाने बाजी मारली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (PAK vs AFG) यांच्यात काल अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 75 धावांनी विजय मिळवला. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाजने (Mohammad Nawaz) अफगाणिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.  

आशिया कप 2025 च्या स्पर्धेआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाजने टी-20 क्रिकेटमध्ये कहर केल्याचं पाहायला मिळाले. मोहम्मद नवाजने गोलंदाजीत हॅटट्रिकसह एकूण 5 विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानला 75 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. या कामगिरीने पाकिस्तानने केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर आगामी आशिया कपसाठी एक मजबूत संदेशही दिला.

W,W,W,W,W...7 चेंडूत 5 विकेट्स-

अंतिम सामन्यात मोहम्मद नवाज सहाव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. नवाजने षटकाच्या पहिल्या 4 चेंडूत फक्त 1 धाव दिली आणि नंतर शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन फलंदाजांना बाद केले. षटकाच्या पाचव्या चेंडूवर नवाजने दरविश रसूलीला बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर त्याने अझमतुल्लाह उमरझाईची विकेट घेतली. ज्यामुळे तो हॅटट्रिकच्या जवळ पोहोचला. त्यानंतर 8 व्या षटकात, जेव्हा नवाज गोलंदाजी करायला परतला तेव्हा यष्टीरक्षक मोहम्मद हॅरिसने पहिल्याच चेंडूवर इब्राहिम झद्रानची विकेट घेतली. नवाजने त्याच्या शानदार गोलंदाजीने हॅटट्रिक पूर्ण करून इतिहास रचला. नवाजच्या गोलंदाजीची जादू इथेच थांबली नाही. त्याने पुढच्या काही चेंडूंमध्ये चौथी विकेट घेतली आणि नंतर त्याच्या शेवटच्या षटकांत अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खानला बाद करून 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. अशा पद्धतीने सात चेंडूत नवाजने 5 विकेट्स पटकावल्या. 

अंतिम सामन्यात अफगाणिस्तानचा लाजिरवाणा पराभव-

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 142 धावा केल्या होत्या. 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, नवाजच्या फिरकी आणि पाकिस्तानच्या अचूक गोलंदाजीसमोर संपूर्ण अफगाणिस्तान संघ 15.5 षटकांत फक्त 66 धावांवर बाद झाला. नवाज व्यतिरिक्त, अबरार अहमद आणि सुफियान मुकीम यांनीही 2-2 विकेट्स घेत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

9 सप्टेंबरपासून रंगणार आशिया चषकाचा थरार, संपूर्ण वेळापत्रक:

9 सप्टेंबर (मंगळवार) : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग10 सप्टेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध युएई11 सप्टेंबर (गुरुवार) : बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग12 सप्टेंबर (शुक्रवार) : पाकिस्तान विरुद्ध ओमान13 सप्टेंबर (शनिवार) : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका14 सप्टेंबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान15 सप्टेंबर (सोमवार) : श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग16 सप्टेंबर (मंगळवार) : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान17 सप्टेंबर (बुधवार) : पाकिस्तान विरुद्ध युएई18 सप्टेंबर (गुरुवार) : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान19 सप्टेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध ओमान

सुपर 4 सामन्यांचे वेळापत्रक-

20 सप्टेंबर (शनिवार) : ग्रुप बी क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 221 सप्टेंबर (रविवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर 223 सप्टेंबर (मंगळवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 224 सप्टेंबर (बुधवार) : गट ब पात्रता 1 विरुद्ध गट अ पात्रता 225 सप्टेंबर (गुरुवार) : गट अ पात्रता 2 विरुद्ध गट ब पात्रता 226 सप्टेंबर (शुक्रवार) : गट अ पात्रता 1 विरुद्ध गट ब पात्रता 128 सप्टेंबर (रविवार) : अंतिम सामना

संबंधित बातमी:

Asia Cup 2025 Full Schedule: आशिया चषकाचा उद्यापासून रंगणार थरार; भारत-पाकिस्तानचा सामना कधी?, A टू Z माहिती