Mohammad Haris Breaks Bat Video : पाकिस्तान क्रिकेट टीमचा इतिहास मोठा आहे, पण त्यात अनेकदा खेळाडूंच्या कृत्यामुळे लाजिरवाण्या घटना घडल्या आहेत. कधी प्रतिस्पर्धी खेळाडूसोबत वाद, कधी चाहत्यांशी गैरवर्तन, तर कधी स्वतःच्या सहकाऱ्यांशीच भांडण असे अनेक किस्से पाकिस्तानच्या खेळाडूंबाबत ऐकायला मिळाले आहेत. राग हा जणू त्यांच्या नाकावर बसलेलाच असतो, मग चूक स्वतःची असो वा नसो. अशीच एक घटना नुकतीच पाकिस्तानी विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद हारिसने घडवली. त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत, म्हणून त्याने संतापाच्या भरात मैदानातच बॅट आपटून तोडली.
आउट होताच रागाच्या भरात तोडली बॅट
आशिया कप 2025 पूर्वी यूएईमध्ये सुरू असलेल्या टी-20 त्रिकोणी मालिकेत हारिसला खेळण्याची संधी मिळाली होती. बराच काळ तो खराब फॉर्ममधून जात असतानाही पाक व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास ठेवत सलग दोन सामन्यांत संधी दिली. मात्र, अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 13 चेंडूत फक्त 15 धावा केल्या, तर तुलनेने कमजोर असलेल्या यूएईविरुद्ध तर तो फक्त 2 चेंडूत 1 धाव काढून माघारी परतला.
शनिवार, 30 ऑगस्ट रोजी शारजाह येथे यूएईचा वेगवान गोलंदाज जुनैद सिद्दीकीने हारिसला सहज आऊट केले. हारिसला वाटलेला शॉट षटकार जाईल, पण बाउंड्रीवर उभ्या फील्डरने झेल पकडला आणि तो परतला. इतक्यातच त्याचा संताप ओसंडून वाहू लागला आणि त्याने डोळ्यांसमोरच मैदानात बॅट आपटली. इतकेच नव्हे तर बॅटचा दांडा आणि फळी वेगळी झाली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाला, गेल्या आठ डावांत हारिस प्रचंड फ्लॉप ठरला असून, 42 चेंडूत केवळ 37 धावा करू शकला आहे.
ICC कडून होणार शिक्षा?
हारिसच्या या कृतीने त्याची खिल्ली उडालीच आहे, पण त्याचबरोबर मोठं संकटही ओढवलं आहे. क्रिकेटच्या नियमांनुसार खेळातील कोणतेही उपकरण जसे की बॅट, बॉल, हेल्मेट यांचा अपमान करणं किंवा त्यांना जाणीवपूर्वक नुकसान करणं गुन्हा मानला जातो. टेनिसमध्ये जसं रॅकेट फोडल्याबद्दल दंड केला जातो, तसंच क्रिकेटमध्येही शिक्षा ठरवली जाते. त्यामुळे हारिसविरुद्ध ICC कारवाई करून दंड आकारू शकते.
हे ही वाचा -