Avesh Khan ODI Debut India : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात युवा गोलंदाज आवेश खानने (Avesh Khan) संघात पदार्पण केलं आहे. याआधी आयपीएल त्यानंतर टीम इंडियाकडून टी20 सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर आता आवेशला भारतीय एकदिवसीय संघाचं (Team India ODI) तिकीट मिळालं आहे. आवेशची आतापर्यंतची कारकिर्द शानदार असल्याचं दिसून आलं आहे, त्यामुळे त्याला आता एकदिवसीय संघातही स्थान मिळालं आहे.


राईट आर्म फास्ट मीडियम बॉलर आवेश खान याने स्थानिक क्रिकेटमध्येही दमदार प्रदर्शन केलं आहे. आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना तर आवेशनं अनेक सामन्यात उत्तम खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच आवेशला भारतीय टी20 संघात स्थान मिळालं. ज्यानंतर आज तो एकदिवसीय संघातही खेळताना दिसत आहे. आतापर्यंत बऱ्याच मोक्याच्या क्षणी आवेशने गोलंदाजी करत संघाला मोठा फायदा करुन दिला आहे. आता एकदिवसीय संघातही तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






 


आवेशची कारकीर्द थोडक्यात


आवेशच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा विचार करता त्याने आतापर्यंत भारताकडून 9 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 8 विकेट्स मिळवले आहेत. याशिवाय आवेशने खेळलेल्या स्थानिक क्रिकेटचा विचार करता याठिकाणी त्याची कामगिरी जबरदस्त दिसून आली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 47 डावांमध्ये 100 विकेट्स पटकावले आहेत. तर लिस्ट ए सामन्यातील 22 मॅचमध्ये 17 विकेट्स नावावर केले आहेत. याशिवाय 38 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 47 विकेट्स आपल्या नावावर केले आहेत. 


हे देखील वाचा-