India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पहिला टी20 रांचीच्या जेएससीए मैदानात सुरु होत असून भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतीय संघाच्या अंतिम 11 चा विचार करता श्रीलंकेविरुद्ध खेळवलेलाच संघ आजही मैदानात उतरताना दिसत आहे. तर नेमक्या संघाचा विचार करता पृथ्वी शॉ बऱ्याच काळानंतर मैदानात परतला असला तरी त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे कुलदीप यादवसह वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडा असे तीन फिरकी गोलंदाजी करु शकणारे गोलंदाज मैदानात आहे. तर सलामीला ईशान किशन, शुभमन गिल हे दोघे येणार आहेत. याशिवाय राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार आणि हार्दिक मधल्या फळीत असणार आहेत. तसंच शिवम मावीसह अर्शदीप सिंह हे वेगवान गोलंदाज मैदानात असतील. दुसरीकडे न्यूझीलंड संघाने एकदिवसीय संघातीलच बहुतांश खेळाडू मैदानात आहेत. नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग कशी आहे पाहूया...


भारतीय संघ - ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग


न्यूझीलंडचा संघ - फिन ऍलन, डेव्हॉन कॉन्वे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर






भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head


भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 22 टी20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 12 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 9 सामने जिंकले आहेत. याशिवाय एका सामना बरोबरीत देखील सुटला आहे.


म्हणून निवडली गोलंदाजी


आजचा सामना होणाऱ्या रांचीच्या मैदानात आजवर खेळल्या गेलेल्या 28 T20 सामन्यांमध्ये, फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 च्या वर धावा करता आल्या आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 160 च्या मध्यभागी आहे. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या संघांला अधिक फायदा मिळू शकणार असल्याने गोलंदाजीचा निर्णय भारतीय संघानं घेतला आहे.  


हे देखील वाचा-