India wins first ODI Coin Toss After 20 Matches : भारतीय क्रिकेट संघानं अखेर 20 वनडे इंटरनॅशनल सामन्यात सलग नाणेफेक हरल्यानंतर 21व्या सामन्यात टॉस जिंकत दुष्काळ संपवला आहे. 6 डिसेंबरला विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडिया उतरत आहे. हा मालिकेचा अंतिम सामना असल्याने टॉस जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं आणि केएल राहुलने टॉसपूर्वी केलेल्या एका टोटक्याने कमाल घडवली.

Continues below advertisement

केएल राहुलने काय केलं?

Continues below advertisement

तिसऱ्या वनडेत केएल राहुलने नेहमीप्रमाणे उजव्या हाताने नव्हे, तर डाव्या हाताने नाणं उचलून टॉस केला. त्याचा हा टोटका यशस्वी ठरला आणि नाणं भारताच्या बाजूने पडलं. टॉस जिंकल्यावर राहुलच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्याने ‘कम ऑन’ असा इशारा करत आनंद व्यक्त केला. नाणेफेक जिंकल्यावर ड्रेसिंग रूममध्येही आनंद दिसत होता. हर्षित राणा तर आनंदानं उड्या मारत ऋषभ पंतला मिठी मारली.

20 सामन्यांनंतर टॉस जिंकला

भारतानं यापूर्वी शेवटचा टॉस वर्ल्ड कप 2023 च्या उपांत्य फेरीत जिंकला होता. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळानंतर नशिबानं भारतीय संघाकडे झुकत टॉसची बाजू बदलली आहे.

भारतीय संघाची प्लेइंग-11 : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग-11 : रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रिट्झके, एडेन मार्कराम, देवाल्ड ब्रेव्हिस, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एनगिडी, ओटेनिल बार्टमन.

हे ही वाचा - 

WBBL News : ऑस्ट्रेलियात मॅचदरम्यान राडा! एक डाव झाल्यानंतर खेळपट्टीवर अचानक आले खड्डे, हाय-व्होल्टेज सामना रद्द, नेमकं काय घडलं?