KL Rahul Ranji Trophy : एकीकडे अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली आणि रेल्वे यांच्यात रणजी ट्रॉफी सामना खेळला जात आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील या सामन्यात खेळत आहे. तर दुसरीकडे रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटक आणि हरियाणा यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज केएल राहुल देखील कर्नाटककडून खेळत आहे.
केएल राहुल 5 वर्षांनी रणजीमध्ये परतला आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना केएल राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु रणजीमध्ये पुनरागमन केल्यानंतर राहुल अपयशी ठरला. चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजाने राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. केएल राहुल बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा भाग होता. पण, या मालिकेत संघातील स्टार खेळाडूची कामगिरी काही खास नव्हती. त्यानंतर बीसीसीआयने सर्व भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश दिले. आता केएल राहुलनेही रणजीमध्ये पुनरागमन केले, पण हरियाणाविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात तो फार काही करू शकला नाही. पहिल्या डावात केएल राहुल फक्त 26 धावा करून बाद झाला. केएल राहुलला वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने बाद केले.
हरियाणाविरुद्ध केएल राहुलचा डाव 37 चेंडूंचा होता, त्यापैकी त्याने 24 डॉट बॉल खेळले, म्हणजेच त्या चेंडूंवर त्याला एकही धाव मिळाली नाही. केएल राहुलने 37 चेंडूत 26 धावा केल्या, ज्यात 4 चौकारांचा समावेश होता. पहिल्या डावात केएल राहुल 26 धावांवर बाद झाला. पण त्याच्याकडे अजूनही सामन्यात एक डाव शिल्लक आहे, ज्यामध्ये तो त्याचे रणजी पुनरागमन मनोरंजक बनवण्यासाठी काहीतरी मोठे करू शकतो. तो त्या संधीचा फायदा घेऊ शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये अशी होती कामगिरी
केएल राहुलने 2024-25 च्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पाचवा आणि भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. राहुलने खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 276 धावा केल्या. या मालिकेत त्याची फलंदाजीची जागा सारखी बदलत असल्याने त्याला खूप संघर्ष करावा लागला. सुरुवातीला रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुलने सलामी दिली आणि रोहित परतल्यानंतर राहुलला पुन्हा मधल्या फळीत फलंदाजी करायला लावण्यात आले.
हे ही वाचा -