Virat Kohli Fan Breaches Security Railways vs Delhi Match : दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील रणजी ट्रॉफी 2024-25 सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने नाणेफेक जिंकून रेल्वेला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. या सामन्यात विराट कोहली दिल्ली संघाचा भाग आहे. विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी अरुण जेटली स्टेडियममध्ये खुप गर्दी केली आहे. दरम्यान, सामन्यात विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहते स्टँडमध्ये उपस्थित असताना एक चाहता मैदानावर आला आणि विराट कोहलीकडे पळत गेला.




सामन्यादरम्यान एका चाहत्याचा मैदानात प्रवेश केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एक चाहता स्टँडमधून थेट मैदानात आला आणि थेट किंग कोहलीकडे धावत गेला. या वेळी, कोहली स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत आहे. चाहत्याने मैदानात येताच कोहलीच्या पायांना स्पर्श केला. यानंतर लगेचच सुरक्षा रक्षक मैदानात येतात आणि चाहत्याला पकडून स्टेडियमबाहेर घेऊन जातात. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चाहत्याला बाहेर काढल्यानंतर सामना पुन्हा सुरू होतो. 




विराट कोहली किंवा त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूंना भेटण्यासाठी सामन्याच्या मध्यभागी एखादा चाहता मैदानात येण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु असे दृश्ये अनेकदा पाहायला मिळतात. आयपीएलमध्ये असे दृश्य अनेकदा पाहायला मिळाले आहेत, जेव्हा चाहते सुरक्षा रक्षकांचा ताफा तोडून विराट कोहलीला भेटायला आले आहेत.




विराट कोहली बऱ्याच काळानंतर परतला रणजी ट्रॉफीमध्ये!


विराट कोहली 12 वर्षांहून अधिक काळानंतर रणजी ट्रॉफीमध्ये परतला आहे. याआधी कोहलीने नोव्हेंबर 2012 मध्ये स्पर्धेतील शेवटचा सामना खेळला होता. आता रेल्वेविरुद्धच्या सामन्यात कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत.




हे ही वाचा -


Shardul Thakur Hat-Trick : W,W,W,W... 'लॉर्ड' शार्दुल ठाकूरचा धमाका, आधी शतक, आता घेतली विकेटची हॅटट्रिक, BCCI निवडकर्त्यांना दिलं चोख उत्तर


ICC Champions Trophy : ना स्टेडियम बांधले... ना संघाची घोषणा... पाकिस्तानची उडाली दाणादाण; ICC स्पर्धा हलवणार?