KL Rahul Athiya Photos : बहुचर्चित असं क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचं लग्न 23 जानेवारी रोजी पार पडलं. लग्नाला आता आठवडा होत आला असला तरी अजूनही या लग्नाची चर्चा आहे. कधी लग्नातील गिफ्ट तर कधी आणखी काही सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा सुरुच आहे. त्यातच आता नवरोबा केएल राहुलने संगीत सोहळ्यातील काही फोटो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यात केएल-अथियाचा खास आनंदी अंदाज दिसून येत आहे.


केएल राहुल आणि अथियाचं लग्न अथियाचे वडिल अभिनेता सुनील शेट्टी याच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. दरम्यान विवाहसोहळ्याचे फोटो त्याच दिवशी समोर आल्यानंतर काही दिवसांनी हळदी समारंभाचे फोटोही समोर आले होते. आता आणखी काही धांसू फोटो राहुलनं शेअर केले असून फोटो पाहून हे संगीत सोहळ्यातील दिसत आहेत. दोघेही डान्स करत असून इतर मंडळीही या फोटोंत दिसत आहेत. लग्नाच्या आदल्या दिवशी अर्थात 22 जानेवारी 2023 रोजीचे हे फोटो असल्याचं राहुलनं दिलेल्या कॅप्शनवरुन दिसत आहे. या फोटोंना अवघ्या काही वेळातच अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं असून कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव होताना दिसत आहे. विशेष म्हणजे केएल राहुलचे सासरेबुवा अर्थात अथियाचे वडिल सुनील शेट्टी याने देखील लव्ह इमोजी पोस्ट केला आहे.  


पाहा राहुलनं शेअर केलेली पोस्ट 






लवकरच होणार ग्रँड रिसेप्शन


अथिया आणि केएल राहुल यांनी आज केवळ 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.  कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. तसेच अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर, जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ, अनुपम खेर, वरुण ऐरन, ईशांत शर्मा आणि आदित्य सील या सेलिब्रिटींनीदेखील लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.  यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत. अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत.


हे देखील वाचा-