KL Rahul Athiya Haldi Ceremony : बरेच दिवस चर्चा असणाऱ्या क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवासोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. अथियाचे वडिल सुनील शेट्टी यांच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही लग्नबंधनात अडकले. दरम्यान विवाहसोहळ्याचे फोटो त्याच दिवशी समोर आल्यानंतर आता हळदी समारंभाचे फोटोही समोर आले आहेत. स्वत: केएल राहुल याने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट करत दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला त्यानं देवनागरी लिपीत 'सुख' असं कॅप्शन दिलं आहे...
या फोटोंना अवघ्या काही वेळातच अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं असून कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव होताना दिसत आहे. विशेष म्हणजे केएल राहुलचे सासरेबुवा अर्थात अथियाचे वडिल सुनील शेट्टी याने देखील लव्ह इमोजी पोस्ट केला आहे. अनेक क्रिकेटसंबधित आणि बॉलीवुडमधील महत्त्वाच्या व्यक्ती यावर कमेंट करताना दिसत आहेत. यामध्ये केएल राहुल अगदी आनंदी वाटत असून हाच आनंद त्याने कॅप्शनमध्ये सुख लिहित व्यक्त केला आहे...
पाहा राहुलची खास पोस्ट
अथिया आणि केएल राहुल यांनी आज केवळ 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. तसेच अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर, जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ, अनुपम खेर, वरुण ऐरन, ईशांत शर्मा आणि आदित्य सील या सेलिब्रिटींनीदेखील लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत.
अथिया-केएल राहुलची लव्हस्टोरी
अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत.
हे देखील वाचा-