Kiron Pollard CPL 2024: कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 च्या सामन्यात कायरन पोलार्डने स्फोटक फलंदाजी केली. तब्बल सात षटकार टोलावत कायरन पोलार्डने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 


कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मध्ये (Kiron Pollard CPL 2024) सेंट लुसिया किंग्ज आणि त्रिनबागो नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात सेंट लुसिया संघाने प्रथम फलंदाजी करत 188 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नाईट रायडर्सने 6 विकेट्स गमावून सामना जिंकला. या सामन्यात कायरन पोलार्डने (Kiron Pollard) आपल्या दमदार फलंदाजीमुळे वर्चस्व गाजवले.


कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझी ट्रिनबागोला विजयासाठी 11 चेंडूत 27 धावांची गरज होती. यावेळी कायरन पोलार्डने चार षटकार मारत संघाला विजयापर्यंत नेले. 19 चेंडूंचा सामना करताना त्याने नाबाद 52 धावा केल्या. कायरन पोलार्डच्या खेळीत एकूण 7 षटकारांचा समावेश होता. सेंट लुसियासाठी फोर्डने 19 वे षटक टाकले. त्याच्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव झाला. यानंतर कायरन पोलार्डने षटकार लगावला. यानंतर तिसरा चेंडूही निर्धाव राहिला. पण या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूंवर कायरन पोलार्डने षटकार मारले गेले. 


7 दमदार षटकार-


किरॉन पोलार्डनं आपल्या 19 चेंडूतील 52 धावांच्या खेळीत एकही चौकार मारला नाही. पण त्याच्या बॅटमधून 7 दमदार षटकार आले.  टी-20 क्रिकेटमध्ये आजही आपला दबदबा असल्याचे या गड्याने दाखवून दिले आहे. कायरन पोलार्डच्या खात्यात या प्रकारात 13209 धावा जमा आहेत. गोलंदाजीत त्याने 322 विकेट्सही घेतल्या आहेत. तो टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टैपलूपैकी एक आहे. 






सामना कसा राहिला?


प्रथम फलंदाजी करताना सेंट लुसिया संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 187 धावा केल्या. यादरम्यान रोस्टन चेसने नाबाद 56 धावा केल्या. 40 चेंडूंचा सामना करताना त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. चार्ल्सने 14 चेंडूत 29 धावा केल्या. तर कर्णधार डु प्लेसिसने 34 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात नाईट रायडर्सने 19.1 षटकांत सामना जिंकला. शकरे पॅरिसने संघासाठी अर्धशतक झळकावले. त्याने 33 चेंडूंचा सामना करत 57 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि सहा षटकार मारले. निकोलस पुरनने 12 चेंडूत 17 धावा केल्या.






संबंधित बातमी:


आयसीसी टी-20 विश्वचषकाचा रंगणार थरार, भारत अन् पाकिस्तान पुन्हा भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक


Vinesh Phogat on PT Usha : "पी. टी. उषा मला भेटण्यासाठी नाही तर फोटो काढण्यासाठी आल्या होत्या",  विनेश फोगाटचा गंभीर आरोप