Cricket Busy Schedule: क्रिकेटला जगातला सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातोय. परंतु, क्रिकेटच्या व्यस्त पत्रकामुळं स्टार क्रिकेटपटूंनी चिंता व्यक्त केलीय. इंग्लंडचा टी-20 संघाचा कर्णधार जोस बटलरनं (Jos Buttler) काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकावर आपलं मत मांडलं होतं. यातच दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज क्विंटन डी कॉकनंही (Quinton de Kock) याबाबत नाराजी व्यक्त केलीय. व्यस्त वेळापत्रकात आणखी सामन्यांचा समावेश केल्यास खेळाडूंना तिन्ही फॉरमेटमध्ये क्रिकेट खेळणं कठीण जाईल, असं क्विंटन डीकॉक यापूर्वी, जोस बटलरनं रविवारी हेडिंग्ले येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामना पावसामुळं रद्द झाल्यानंतर संघाच्या व्यस्त वेळापत्रकावर टीका केली होती.


क्विंटन डी कॉक मोठं वक्तव्य
गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या क्विंटन डी कॉक म्हणाला की, "खेळाडूंनी वैयक्तिकरित्या निर्णय घेणे आवश्यक आहे. जर त्यांना तिन्ही फॉरमेटमध्ये खेळू शकतात, असं वाटतं असेल, अशा खेळाडूंसाठी मी आनंदी आहे. परंतु, खेळाडूंनी स्वत:साठी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.  मला काही लीग खेळण्याचा करार मिळाला आहे, पण तो माझा स्वतःचा निर्णय आहे. ज्यात खेळण्यात मला आनंद आहे. क्रिकेटमध्ये युवा फलंदाजाला तिन्ही फॉरमेट खेळायचं असतं आणि आपल्या कारकिर्दीत काही महत्वाचा टप्पा गाठायचा असतो. जसे-जसे तुमचा खेळ पुढे जातो, तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावा लागतं आणि शरीर पहिल्यासारखं तुम्हाला साथही देत नाही. ही फक्त व्यवस्थापनाची बाब आहे."


स्टोक्सच्या एकदिवसीय निवृत्तीनंतर 
इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सनं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तिन्ही फॉरमेटच्या खेळण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातायेत. यावेळी स्टोकच्या निर्णयाचं समर्थन करत एकदिवसीय क्रिकेटला संपुष्टात आणण्याचं विधान केलं होतं. तर, इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसैन यांनी आयसीसीच्या वेळापत्रकाला वेडेपणाचं असल्याचं बोललं.


जोस बटलर काय म्हणाला?
हेडिंग्ले येथे प्रोटीज विरुद्ध रद्द झालेल्या निर्णायक एकदिवसीय सामन्यानंतर जॉस बटलरनं व्यस्त वेळापत्रकावर भाष्य केलं होतं. खेळाडूंचं वेळापत्रक किती व्यस्त आहे, यानं काही फरक पडत नाही. परंतु, एका गोष्टीची खंत वाटते, संघासाठी प्रशिक्षण महत्वाचं असताना आमच्याकडं सरावासाठी जास्त वेळ मिळत नाही. 


हे देखील वाचा-