JioHotstar Streaming Platform Launched : जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारने एकत्र येऊन तयार केलेले नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टार (JioHotstar) शुक्रवारी जिओस्टारने लाँच केले. नव्याने तयार केलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये दोन्ही ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मचा संपूर्ण कंटेंट म्हणजे, वेब सिरीज, मूव्ही, क्रिकेट आता एका अॅपवर असतील.
जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार या दोन्ही विलीनीकरण संस्थांमधील क्रिकेट शो आणि मूव्ही, वेब सिरीजव्यतिरिक्त जिओहॉटस्टार प्लॅटफॉर्म विविध आंतरराष्ट्रीय स्टुडिओ आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील कंटेंट देखील होस्ट करणार आहे. स्ट्रीमिंग सेवेसाठी एक विनामूल्य टियर देखील जाहीर केला आहे.
जिओहॉटस्टार स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लाँच!
एका प्रेस रिलीजमध्ये, जिओस्टारने जिओहॉटस्टार लाँच करण्याची घोषणा केली आणि नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मबद्दल अपडेट शेअर केले. कंपनीने म्हटले आहे की, नवीन प्लॅटफॉर्ममध्ये अंदाजे 300,000 तासांचा कंटेंट तसेच लाईव्ह स्पोर्ट्स कव्हरेज असेल. लाँचच्या वेळी, दोन्ही प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांना एकत्रित करून प्लॅटफॉर्मचा एकूण युजर्स 50 कोटींहून करण्यात आले आहे. नवीन प्लॅटफॉर्मचा एक नवीन लोगो देखील तयार केला आहे, ज्यामध्ये जिओहॉटस्टार हा शब्द आहे आणि त्यासोबत एक सात-बिंदूंचा स्टार आहे.
सध्या जिओहॉटस्टार पाहण्यासाठी मोफत आहे. वापरकर्त्यांना शो, मुव्ही किंवा लाईव्ह क्रिकेट पाहण्यासाठी सबस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. पण, सबस्क्रिप्शनचे काही प्लॅन आहेत. ज्यामध्ये, पैसे देणाऱ्या सबस्क्राइबर्सना जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत.
सबस्क्रिप्शनबद्दल बोलायचे झाले तर, जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्राइबर्स आपोआप नवीन प्लॅटफॉर्मवर जातील. कंपनीने म्हटले आहे की हे वापरकर्ते पहिल्यांदा लॉग इन करताना त्यांचे जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन सेट करू शकतील. नवीन सबस्क्राइबर्स 149 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या नवीन प्लॅन ब्राउझ करू शकतात.
जिओहॉटस्टारमध्ये 10 भारतीय भाषांमध्ये कंटेंट असेल. प्रेक्षक मूव्ही, शो, अॅनिमे, डॉक्युमेंटरी, लाईव्ह क्रिकेट इव्हेंट आणि बरेच काही पाहू शकतील. कंपनीने असेही म्हटले आहे की, प्लॅटफॉर्म आंतरराष्ट्रीय प्रीमियर प्रदर्शित करेल. याव्यतिरिक्त, जिओहॉटस्टारमध्ये डिस्ने, एनबीसीयुनिव्हर्सल पीकॉक, वॉर्नर ब्रदर्स, डिस्कव्हरी एचबीओ आणि पॅरामाउंट मधील कंटेंट देखील असेल.
हे ही वाचा -