Jaydev Unadkat IND vs BAN: जयदेव उनाडकट याची भारतीय संघात पुनरागमन झालेय. 12 वर्षानंतर जयदेव टीम इंडियाचा भाग झालाय. जयदेव उनाडकटने 2010 मध्ये भारतासाठी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. टीम इंडियात निवड झाल्यानंतर जयदेव उनाडकटचं जुनं एक ट्वीट व्हायरल होतेय. चार जानेवारी 2022 रोजी जयदेव उनाडकटनं ट्वीट केले होते. त्यात त्यानं म्हटले होते, 'प्रिय रेड बॉल क्रिकेट, मला आणखी एक संधी दे... मी चांगली कामगिरी करेल. ' शनिवारी बीसीसीआयने जयदेवच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर त्याचं जुनं ट्वीट व्हायरल झालं. त्याशिया अनेक दिग्गज क्रिकेटरने जयदेवला शुभेच्छा दिल्या. 






शामीच्या जागी मिळाली संधी -
वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला दुखापत झाल्यामुळे जयदेव उनाडकटसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले. मोहम्मद शामीच्या जागी बीसीसीआयने जयदेवला स्थानं दिले. तब्बल 12 वर्षानंतर जयदेवनं भारतीय संघात पुनरागमन केलेय. 


जयदेव उनाडकटची कामगिरी -
जयदेव उनाडकटने डिसेंबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला. या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही.  जयदेव उनाडकटचा हा पहिला आणि अखेरचा कसोटी सामना ठरला होता. त्यानंतर तब्बल 12 वर्षानंतर उनाडकटला टीम इंडियात स्थान मिळालं आहे. उनाडकटला संघात स्थान मिळाल्यानंतर ट्वीटरवर त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. 


मागील काही दिवसांपासून उनाडकट देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. कसोटी संघातून डावलल्यानंतर उनाडकटला मर्यादीत षटकांमध्ये संधी देण्यात आली होती. जयदेवने डिसेंबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला. या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. यानंतर तब्बल तीन वर्षांनी उनाडकटची पुन्हा भारतीय संघात निवड झाली. 2013 मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर होता, त्या संघात उनाडकटला संधी देण्यात आली होती. त्यावेळी त्याने 7 वन डे सामन्यात 8 विकेट घेतला होता. मग पुन्हा उनाडकटला डावलण्यात आलं. पुन्हा तीन वर्षांनी जून 2016 मध्ये तो परत झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 संघात निवडला गेला. 2018 पासून जयदेवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. आता 12 वर्षानंतर जयदेवनं संघात पुनरागमन केलेय, त्याला संघात स्थान मिळाल्यास कामगिरी कशी करतो, याकडे सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलेय. 


विकेट किती?
जयदेवला कसोटीत एकही विकेट घेतला आली नाही. तर सात एकदिवसीय सामन्यात त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. तर 10 टी 20 सामन्यात त्याला 14 विकेट मिळाल्या आहेत. आयपीएलमध्ये 91 सामन्यात 91 विकेट घेतल्या आहेत.