Ranji Trophy 2022-23: दिल्ली आणि सौराष्ट्र (Saurashtra vs Delhi) यांच्यात रणजी ट्रॉफीतील गट सामना खेळला जातोय. या सामन्यात दिल्लीच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium) खेळल्या जात असलेल्या या सामन्यातील पहिल्याच षटकात सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटनं (Jaydev Unadkat) हट्ट्रिक घेऊन खास विक्रमाला गवसणी घातलीय. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेता आली नाही. अशी कामगिरी करणारा जयदेव उनाडकट पहिलाच गोलंदाज ठरलाय.

दरम्यान, 12 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकट उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.त्याने रणजी ट्रॉफी गट-बी सामन्यात दिल्लीविरुद्ध पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेत इतिहास रचला. पहिल्याच षटकात एकही धाव न देता हॅटट्रिक घेणारा तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरलाय. त्यानं आपल्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे ध्रुव शौरे, वैभव रावल आणि दिल्लीचा कर्णधार यश धुल यांना आपल्या जाळ्यात अडकलं. 

ट्वीट-

 

जयदेव उनाडकटची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

क्रिकेट सामना डाव विकेट्स सरासरी इकोनॉमी 5w
कसोटी 2 3 3 56.00 3.29 0
एकदिवसीय 7 7 8 26.12 4.01 0
टी-20 10 10 14 21.50 8.68 0

 

हे देखील वाचा-

PAK vs NZ Day 1 Stumps: डेवॉन कॉन्वेचं दमदार शतक, पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंडची धावसंख्या 309/6 वर