Jasprit Bumrah cryptic instagram story : भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. देशभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपधील उत्कृष्ट कामगिरीमुळे बुमराह चर्चेत राहिला. त्याच्या खेळातील साधेपणा आणि शांत स्वभावामुळे तो त्याच्या चाहत्यांचा लाडका आहे. 


सोशल मीडियावरही त्याची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. इंस्टाग्रामवर त्याचे सुमारे 17.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे अनेक क्रिकेटपटूंपेक्षा खूप जास्त आहेत. बुमराह सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी जोडलेला असतो. दरम्यान, बुमराहने त्याच्या इंस्टाग्रामवर एक रहस्यमय स्टोरी शेअर केली आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.


वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सॅम होवेसचा एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सॅम म्हणतोय की, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळते तेव्हा प्रत्येकजन आपल्यावर जळत असतो, पण लोकांना आपण ट्रॉफी घेताना दिसतो पण मैदानावर केलेले प्रशिक्षण दिसत नाही. त्याचवेळी, सॅमच्या या व्हिडिओमध्ये, कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, प्रत्येकाला असे वाटते की त्याला काहीतरी हवे आहे, जोपर्यंत त्याला हे प्राप्त करण्यासाठी काय आवश्यक आहे हे कळत नाही.






बुमराह बांगलादेश मालिकेला मुकण्याची शक्यता 


भारतीय संघ ॲक्शनमध्ये नसल्याने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या ब्रेकवर आहे. भारताचे सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत असताना बुमराहसह काही खेळाडू सध्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. आता भारतीय संघाला या महिन्याच्या 19 तारखेपासून बांगलादेशसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत सहभागी व्हायचे आहे.


जिथे भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, जसप्रीत या मालिकेत भाग घेणार नाही . भारताने नुकतेच टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजेतेपद पटकावले होते, ज्यामध्ये बुमराहने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते, ज्यासाठी त्याला टूर्नामेंटच्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला होता.


हे ही वाचा -


Babar Azam : अब तेरा क्या होगा बाबर..., पुन्हा कर्णधारपदावरून होणार हकालपट्टी? पाकच्या क्रिकेट विश्वात हालचालीना वेग


Brij Bhushan Singh on Vinesh Phogat : "काँग्रेसला पश्चाताप..." बजरंग पुनिया अन् विनेशच्या पक्ष प्रवेशानंतर ब्रिजभूषण सिंह काय म्हणाले? पाहा व्हिडिओ


Abhishek Jain sidearm specialist : घरातील परिस्थितीमुळे सोडलं क्रिकेट, मात्र धोनीपासून ते सूर्याच्या यशात दिले मोठे योगदान, कोण आहे अभिषेक जैन?