Jasprit Bumrah News : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. वनडे, टी 20 आणि कसोटीमध्ये अव्वल स्थान पटकावणारा (ICC Rangking) जसप्रीत बुमराह पहिलाच गोलंदाज ठरलाय. बुधवारी आयसीसीने (ICC) कसोटी क्रमवारी जारी केली. जसप्रीत बुमराह याने नुकतेच इंग्लंडविरोधात (IND vs ENG) दुसऱ्या कसोटी सामन्यात नऊ विकेट घेतल्या होत्या. पहिल्या सामन्यातही त्याने भेदक मारा केला होता. जसप्रीत बुमराह याने जोरदार कमबॅक करत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. बुमराहने अश्विनला खाली खेचत अव्वल स्थान काबिज केलेय. फक्त 34 कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने अव्वल स्थानावर झेप घेतली. आघाडीच्या दहा गोलंदाजामध्ये जसप्रीत बुमराहशिवाय आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांचा समावेश आहे. (Jasprit Bumrah Becomes the First Bowler in History to Be No.1 Ranked in All the 3 Formats)


जसप्रीत बुमराह याने भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विन याला पछाडत अव्वल स्थान काबिज केलेय. ताज्या क्रमवारीनुसार, अश्विन याला दोन अंकाचा फटका बसलाय. अश्विन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. जसप्रीत बुमराह 881 अंकासह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रबाडाकडे 851 पॉईंट्स आहेत. आर. अश्विन 841 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा स्टार फिरकी गोलंदाज  रवींद्र जडेजा 746 पॉईंट्ससह नवव्या क्रमांकावर विराजमान आहे. 






बुमराहचं जोरदार कमबॅक - 


जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. त्याने जोरदार कमबॅक केले. 2022 मध्ये जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. बुमराहवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर बुमराह याने टी 20 क्रिकेटमधून सर्वात आधी क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केले. त्यानंतर वनडे आणि आता कसोटीमध्ये त्याने जोरदार कमबॅक केलेय. यंदाच्या वर्षात चार कसोटी सामने खेळत जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान पटकावले आहे. जसप्रीत बुमराहने फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवरही विकेट घेतल्या आहेत.