Ireland vs India: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं यजमान आयर्लंडचा 4 धावांनी पराभव करत मालिका 2-0 नं जिंकली. या सामन्यान आयर्लंडच्या संघानं कडवी झुंज दिली. अखेरच्या षटकात आयर्लंडला 17 धावांची गरज असताना कर्णधार हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिककडं (Umran Malik) चेंडू सोपावला. हार्दिक पांड्यानं दाखवलेल्या विश्वासावर उमरान मलिक खरा उतरला. अखेरच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूत 9 धावा गमावणाऱ्या उमरान मलिकनं शेवटच्या तीन चेंडूत भेदक गोलंदाजी करत जबरस्त कमबॅक केलं.
अखेरच्या षटकात काय घडलं?
भारतानं दिलेल्या 226 धावांचा पाठलाग करणाऱ्या आयर्लंडच्या संघाला अखेरच्या षटकात 17 धावांची गरज होती. परंतु, या षटकातील पहिल्या तीन चेंडूत उमरान मलिकनं 9 धावा खर्च केल्या. अखेरच्य तीन चेंडूत आयर्लंडला सात धावांची गरज होती. सामना भारताच्या हाताबाहेर जात असल्याचं दिसत होतं. मात्र, उमरान मलिकनं जबरदस्त कमबॅक करत शेवटच्या तीन चेंडूत फक्त तीन धावा दिल्या आणि भारतानं सामना चार धावांनी जिंकला.
विजयानंतर हार्दिक पांड्या काय म्हणाला?
या सामन्यात विजय मिळवल्यानंतर हार्दिक पाड्यानं आपली प्रतिक्रिया दिली. "मी दबाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मला फक्त सामन्यात सध्या काय सुरू आहे, यावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. अखेरच्या षटकात आयर्लंडला 17 धावांची गरज होती. उमरानच्या वेग लक्षात घेता 17 धावा करणं कठीण होतं. परंतु, आयर्लंडनं कडवी झुंज दिली, याचं श्रेय त्यांना मिळालं पाहिजे. श्रेय आमच्या गोलंदाजांनाही जातं, ज्यांनी सामना भारताच्या झोळीत टाकला."
हे देखील वाचा-
- Deepak Hooda: दीपक हुडा चमकला! आयर्लंडविरुद्ध शतक झळकावून रचला इतिहास
- IND vs IRE : भारताची आयर्लंडला क्लीन स्वीप, सामन्यासह मालिकेवरही कोरलं नाव, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
- IND vs IRE, Match Highlights : रोमहर्षक सामन्यात आयर्लंडची कडवी झुंज व्यर्थ, भारताचा 4 धावांनी विजय, मालिकाही खिशात