IPL Winners List: यंदाच्या आयपीएल फायनलसाठी 3 जूनला पंजाब किंग्स आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु मध्ये अंतिम लढत होईल. जाणून घ्या आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणकोणत्या टीम्सने विजेतेपदाचा मान पटकावला..

हे तर निश्चितच आहे की यावेळी आयपीएलला एक नवा चॅम्पियन संघ मिळणार, कारण यंदा फायनलमध्ये पदार्पण केलेल्या पंजाब किंग्स आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलुरुने आजतागायत आयपीएल विजेतेपद जिंकलेले नाही. दोन्ही संघांदरम्यान अंतिम सामना हा 3 जून रोजी  नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे होईल. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणते संघ विजेते तर कोणते उपविजेते राहिले याची आढावा आपण घेणार आहोत.

आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांना सर्वाधिक वेळा ट्रॅाफी मिळवण्याचा मिळाला. दोन्ही संघांची प्रत्येकी 5 वेळा ट्रॅाफीज् जिंकल्या आहेत. परंतु, यावर्षी त्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकल्या नाही.  चेन्नई सुपर किंग्ज पॅाईंट टेबलच्या तळाशी राहिले आणि प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. तर मुंबई इंडियन्सने चौथे स्थान मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला परंतु, क्वालिफायर-2 मध्ये  त्यांना पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला.

आयपीएल विजेत्यांची यादी (2008 ते 2024 पर्यंत )

आयपीएल 2008 विजेता: राजस्थान रॉयल्सआयपीएल 2009 विजेता: डेक्कन चार्जर्सआयपीएल 2010 विजेता: चेन्नई सुपर किंग्जआयपीएल 2011 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2012 विजेता: कोलकाता नाईट रायडर्सआयपीएल 2013 विजेता: मुंबई इंडियन्सआयपीएल 2014 विजेता: कोलकाता नाईट रायडर्सआयपीएल 2015 विजेता: मुंबई इंडियन्सआयपीएल 2016 विजेता: सनरायझर्स हैदराबादआयपीएल 2017 विजेता: मुंबई इंडियन्सआयपीएल 2018 विजेता: चेन्नई सुपर किंग्जआयपीएल 2019 विजेता: मुंबई इंडियन्सआयपीएल 2020 विजेता: मुंबई इंडियन्सआयपीएल 2021 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2022 विजेता: गुजरात टायटन्सआयपीएल 2023 विजेता: चेन्नई सुपर किंग्जआयपीएल 2024 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स

आयपीएलमधील प्रत्येक हंगामातील उपविजेते

2008: चेन्नई सुपर किंग्ज2009: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू2010: मुंबई इंडियन्स2011: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू2012: चेन्नई सुपर किंग्ज 2013: चेन्नई सुपर किंग्ज 2014: पंजाब किंग्ज 2015: चेन्नई सुपर किंग्ज 2016: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू2017: रायझिंग पुणे सुपरजायंट्स2018: सनरायझर्स हैदराबाद2019: चेन्नई सुपर किंग्ज 2020: दिल्ली कॅपिटल्स2021: कोलकाता नाईट रायडर्स2022: राजस्थान रॉयल्स2023: गुजरात टायटन्स2024: सनरायझर्स हैदराबाद

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सर्वोत्तम ठरणारा खेळाडू आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक वेळा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम सुनील नरेनच्या नावावर आहे. त्याने हा पुरस्कार एकूण 3 वेळा वर्ष 2012, 2018 आणि 2014 मध्ये जिंकला आहे.

सर्वाधिक आयपीएल फायनल खेळलेला संघचेन्नई सुपर किंग्ज हा सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल खेळणारा संघ आहे. तो एकूण 10 फायनल खेळला आहे, त्यापैकी त्याने 5 सामने जिंकले आहेत आणि तेवढ्याच वेळा तो हरला देखील आहे. मुंबई इंडियन्सने 6 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यापैकी फक्त 1 वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू किती वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत?यावर्षी आयपीएल फायनलमध्ये धडक मारण्यापूर्वी आरसीबीने एकूण 3 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु त्यांना कधीही ट्रॉफी जिंकता आली नाही. आरसीबीने 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरी गाठली होती.

पंजाब किंग्ज किती वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत?2025 पूर्वी, पंजाब फक्त एकदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, 2014 मध्ये त्यांना केकेआरकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून, हा संघ पहिल्यांदाच अंतिम सामना खेळणार आहे.