IPL Auction 2026 Most Expensive Player List: आयपीएल 2026 साठी खेळाडूंचा लिलाव काल (16 नोव्हेंबर) अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे झाला. आयपीएलच्या या लिलावात एकूण 369 खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती, त्यापैकी 77 खेळाडूंची विक्री झाली. विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये 48 भारतीय आणि 29 परदेशी स्टार खेळाडूंचा समावेश होता. आयपीएलमधील सर्व संघांनी एकूण 215.45 कोटी रुपये खर्च केले. तथापि, या एकूण रकमेपैकी जवळपास 40% रक्कम फक्त पाच खेळाडूंवर खर्च झाली. (Most Expensive Player IPL 2026)
1. कॅमेरॉन ग्रीनला 25.20 कोटी रुपये मिळाले- (Cameron Green IPL 2026)
आयपीएल 2026 च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन ठरला. कॅमेरॉन ग्रीनला केकेआरने 25.20 कोटी रुपयांना खरेदी केले. कॅमेरॉन ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू देखील बनला. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. 2023 मध्ये ग्रीनला 17.50 कोटी रुपयांमध्ये आरसीबीने खरेदी केले होते.
2. मथिशा पाथिरानाला 18 कोटी रुपये मिळाले- (Matheesha Pathirana IPL 2026)
केकेआरने या हंगामातील दुसरी सर्वात मोठी बोली लावली. त्यांनी श्रीलंकेचा गोलंदाज मथिशा पाथिरानाला 18 कोटी रुपयांना विकत घेतले. केकेआरने फक्त दोन खेळाडूंवर 43.20 कोटी रुपये खर्च केले.
3. चेन्नईने दोन अनकॅप्ड खेळाडूंसाठी विक्रमी बोली- (Kartik Sharma Prashant Veer IPL 2026)
तिसरा सर्वात महागडा खेळाडू कार्तिक शर्मा होता, ज्याला चेन्नई सुपर किंग्जने 14.20 कोटी रुपयांना खरेदी केले. सीएसकेने प्रशांत वीरलाही 14.20 कोटी रुपयांना विकत घेतले. सीएसकेने 28.40 कोटी रुपयांना दोन अनकॅप्ड खेळाडू जोडले.
4. हैदराबादने लिअम लिव्हिंगस्टोनवर लावली तगडी बोली- (Liam Livingstone IPL 2026)
आयपीएल लिलावाच्या पहिल्या फेरीत लिअम लिव्हिंगस्टोनवर कोणीही बोली लावली नाही. दुसऱ्या फेरीत लिलाव पुन्हा सुरू झाला तेव्हा त्याचे नशीब बदलले. सनरायझर्स हैदराबादने लिअम लिव्हिंगस्टोनला 13 कोटी रुपयांना खरेदी केले.
5. लिलावाचा 40 टक्के पैसा फक्त 5 खेळाडूंवर खर्च- (IPL Auction 2026 Most Expensive Player)
यंदाच्या लिलावात आयपीएल संघांनी टॉप पाच खेळाडूंवर अंदाजे 86 कोटी रुपये खर्च केले. एकूण 215 कोटी रुपयांची बोली लागली. याचा अर्थ लिलावाच्या 40 टक्के पैशांचा खर्च फक्त पाच खेळाडूंवर झाला.
मुस्तफिजूर रहमानला मिळाले 9.20 कोटी रुपये- (IPL Auction 2026)
याशिवाय, 2 कोटींच्या बेस प्राइस असलेल्या मुस्तफिजूर रहमानला केकेआरने 9.20 कोटींना, 2 कोटींच्या बेस प्राइस असलेल्या जॉश इंग्लिसला एलएसजीने 8.60 कोटींना, 30 लाखांच्या बेस प्राइस असलेल्या आकिब नबी दारला डीसीने 8.40 कोटींना, 2 कोटींच्या बेस प्राइस असलेल्या रवी बिश्नोईला आरआरने 7.20 कोटींना, 2 कोटींच्या बेस प्राइस असलेल्या व्यंकटेशन अय्यरला आरसीबीने 7 कोटींना, 2 कोटींच्या बेस प्राइस असलेल्या जेसन होल्डरला गुजरातने 7 कोटींना, 1 कोटींच्या बेस प्राइस असलेल्या राहुल चहरला सीएसकेने 5.20 कोटींना, 30 लाखांच्या बेस प्राइस असलेल्या मंगेश यादवला आरसीबीने 5.20 कोटींना खरेदी केले.