MS Dhoni Practice Video Goes Viral: भारतीय संघाचा माजी स्टार क्रिकेटपटू आणि आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चाहत्यांसाठी महत्वाची माहिती समोर आलीय. दिर्घकाळापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब असलेला धोनीनं पुन्हा एकदा मैदानात उतरलाय. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून धोनीनं आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी सरावाला सुरुवात केल्याचं बोललं जातंय.


महेंद्रसिंह धोनीची गणना जगातील उत्कृष्ट कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीच्या नेतृत्वात भारतानं आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर, आयपीएलमध्ये धोनीनं चेन्नईच्या संघाला चार ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत.आयपीएलच्या मागच्या हंगामात चेन्नईच्या संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली. या हंगामात चेन्नईच्या संघाला प्लेऑफमध्येही जागा मिळवता आली नव्हती. यातच धोनीनं आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी सरावाला सुरुवात केलीय. आयपीएलचा पुढचा हंगाम धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील अखेरचा असेल, असं बोललं जातंय. धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. आयपीएलच्या मागच्या हंगामात धोनीला काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु, आयपीएलच्या पुढच्या हंगामात धोनीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. 


व्हिडिओ- 






 


आयसीसीच्या तीन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक  आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.


महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि  98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 10 हजार 773 धावांची नोंद आहे. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्यानं एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-