IBSA World Games 2023 : भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने (Indian Women's Blind cricket team) इतिहास रचला आहे. आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये भारतीय अंध क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा (Australia) 163 धावांनी पराभव करुन इतिहास रचला आहे. अंध क्रीडा प्रकारात अंतिम फेरी गाठणारा हा पहिला संघ ठरला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 245 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही.


प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सार्थ


ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय महिला अंध क्रिकेट संघाची कर्णधार वर्षा उमापती हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. भारताने सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सलामीवीर बी हंसडाची पहिली विकेट गमावली. यानंतर एस दास आणि दीपिका टीसी दोघेही डाव पुढे नेतील अशी सर्वांना अपेक्षा होती, परंतु दीपिका टीसी धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्यामुळे कोणतीही मोठी भागीदारी रचू शकली नाही. यानंतर भारताकडून जी नीलप्पा आणि एस दास यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीच्या बळावर भारताने 245 धावांची मोठी धावसंख्या उभारली.


 




246 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं संघानं चांगली सुरुवात केली होती. पण भारतीय संघाची गोलंदाज प्रियाने 34 धावांची सलामीची भागीदारी मोडून भारताला यश मिळवून दिले. त्यांचा सलामीचा फलंदाज सी लुईसची विकेट घेतली. 35 धावांवरच ऑस्ट्रेलियन संघानं 4 विकेट गमावल्या होत्या. 


इंग्लंडविरुद्ध होणार अंतिम सामना 


दरम्यान, भारतीय अंध महिला संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. 163 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघ आता अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. शनिवारी (25 ऑगस्ट) इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: