Yashasvi Jaiswal : 105 धावा केल्या, पण 165 धावा दिल्या, 4 कॅच सोडले; यशस्वी जैस्वालच सर्वात मोठा विलन ठरला!

हेडिंग्ले येथे मंगळवारी पार पडलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 गडी राखून विजय मिळवला.

Yashasvi Jaiswal 4 catches dropped

1/10
हेडिंग्ले येथे मंगळवारी पार पडलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 गडी राखून विजय मिळवला.
2/10
भारताने प्रथम फलंदाजी करताना समाधानकारक धावसंख्या उभारली होती, मात्र गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांमुळे इंग्लंडला सहज विजय मिळवता आला.
3/10
या सामन्यात यशस्वी जैस्वालची कामगिरी विशेषतः क्षेत्ररक्षणात निराशाजनक ठरली.
4/10
यशस्वी जैस्वालने चार झेल सोडले, जे निर्णायक ठरू शकले असते. त्यामुळे हा सामना जैस्वालसाठी लक्षात राहण्यापेक्षा विसरण्यासारखा ठरला.
5/10
तो एका कसोटी डावात सर्वाधिक झेल सोडणारा भारतीय खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम अजिंक्य रहाणेच्या नावावर होता. 2019 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध तीन झेल सोडले होते.
6/10
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने अनेक झेल सोडले. त्याने पहिल्या डावात 11 धावांवर बेन डकेटचा झेल सोडला, त्यानंतर डकेटने 62 धावा केल्या.
7/10
60 धावांवर ऑली पोपचा झेल सोडला आणि त्याने 106 धावा केल्या.
8/10
83 धावांवर हॅरी ब्रूकचा झेल सोडला आणि तो 99 धावा करू शकला.
9/10
दुसऱ्या डावातही यशस्वीने 97 धावांवर बेन डकेटचा झेल सोडला, त्यानंतर त्याने 149 धावा केल्या.
10/10
यशस्वी जैस्वालने अनेक महत्त्वाचे झेल चुकवले. त्यामुळे इंग्लंडच्या 165 धावा जास्त झाल्या.
Sponsored Links by Taboola