Suresh Raina Song for daughter : भारतीय संघाचा माजी स्टार खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त गाण्यातही अनेक वेळा आपलं टॅलेंट दाखवलं आहे. त्याला संगीताची खूप आवड असल्याच अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त त्याने अनेकदा गाणीही गायली आहेत. यातील एक गाणं, 'बिटिया रानी', जे त्याने त्याची मुलगी ग्रेसियासाठी (Suresh Raina daughter) गायलं आहे. स्वतः रैनाने बुधवारी (1 मार्च) ट्विटरच्या माध्यमातून याचा खुलासा केला आहे. रैनाने हे गाणे 2018 मध्ये गायलं होते. जे आता रैनाने स्वत: त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन पोस्ट केलं आहे.


बिटिया रानी गाणं रैनासाठी खूपच खास


सुरेश रैनाने 2018 मध्ये त्याची मुलगी ग्रेसियासाठी 'बिटिया रानी' (Bitiya Rani Song) हे गाणं रेकॉर्ड केलं होते. रैनाचं हे गाणे त्यावेळी खूप वेगाने व्हायरल झाले होते. त्यावेळी चाहत्यांसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी रैनाचं या सुंदर गाण्यासाठी (Suresh Raina Song) कौतुक देखील केलं होतं. त्याचवेळी रैनाने हे गाणे आठवत बुधवारी पुन्हा एकदा ट्वीट केलं आहे. त्याने ट्वीट करुन लिहिलं की, "हे गाणं मला नेहमी चांगल्या मूडमध्ये ठेवतं. हे माझ्यासाठी कायम खास असून माझ्या मनाच्या खूपच जवळ आहे."


पाहा रैनानं पोस्ट केलेला VIDEO-






केसीसी टूर्नामेंटमध्ये रैनाची जबरदस्त फलंदाजी


सुरेश रैना क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर (Cricket) आजही अनेकदा मैदानावर खेळताना दिसतो. नुकताच तो केसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळताना दिसला. या मॅचमध्ये त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीच्या माध्यमातून दमदार कामगिरी केली. रैनाने या सामन्यात 29 चेंडूत 54 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचबरोबर यानंतर गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी करत 2 बळी आपल्या नावावर केले. क्षेत्ररक्षणासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या रैनाने या सामन्यातही आपलं क्षेत्ररक्षण कौशल्य दाखवत विरोधी संघाच्या फलंदाजांना धावचीत केलं. रैनाच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.


हे देखील वाचा-


IND vs AUS, 3rd Test : 11 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे 6 गडी बाद, 197 धावांवर ऑलआऊट, 88 धावांची पिछाडी घेऊन भारत मैदानात