Cricket World Cup : भारतीयांचा सर्वात आवडता खेळ असणाऱ्या क्रिकेटचा विषय निघाला की, समोर येतं ते नाव म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावावर असंख्य विक्रम आहेत. क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावरच असून सचिनने आजच्याच दिवशी विश्वचषकात पदार्पण केलं होतं. 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केल्यानंतर सचिन सर्वात आधी 1992 च्या विश्वचषकात खेळला. त्यानंतर आजवर त्याने बऱ्याच धावा केल्या. विश्वचषकात सर्वाधिक धावा सचिनच्याच नावावर आहेत. नेमकी ही क्रमवारी कशी आहे यावर एक नजर फिरवूया...


क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा



  1. सचिन तेंडुलकर - या यादीत सर्वाधिक धावा सचिनच्याच नावावर आहेत. सचिनने 2 हजार 278 धावा विश्वचषकात केल्या आहेत. 

  2. रिकी पॉटिंग - सचिननंतर नंबर लागतो, माजी दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पॉटिंगचा. रिकीने 1 हजार 743 धावा क्रिकेट विश्वचषकात केल्या आहेत.

  3.  कुमार संगकारा - श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू कुमार संगकाराने 1 हजार 532 धावा क्रिकेट विश्वचषकात केल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  4. ब्रायन लारा - वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने 1 हजार 225 धावा केल्या असून तो चौथ्या क्रमांकावर आहे.

  5. एबी डिव्हिलीयर्स - दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलीयर्सने 1 हजार 207 धावा केल्या असून तो पाचव्या क्रमांकावर आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha