Robin Uthappa Retirement: विस्फोटक भारतीय क्रिकेपटू रॉबिन उथप्पा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रॉबिन उथप्पाने बुधवारी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीच्या घोषणेनंतर रॉबिन उथप्पाला नव्या इनिंगसाठी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. आजी-माजी क्रिकेटपटूसह चाहत्यांनी उथप्पासाठी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


बुधवारी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रॉबिन उथप्पाने एकदिवसीय आणि टी 20 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेय. 2007 मधील विश्वविजेत्या टी 20 संघाचा तो सदस्य राहिलाय. धोनीच्या नेतृत्वात उथप्पानं 2007 चा टी 20 विश्वचषक खेळला आहे. 






 2006 मध्ये रॉबिन उथप्पाचं आंतरराष्ट्रीय पदार्पण - 
विस्फोटक फलंदाज रॉबिन उथप्पानं 2006 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याआधी त्यानं 2004 मध्ये अंडर 19 विश्वकप संघाचा तो सदस्य होता. रॉबिन उथप्पा याने भारतासाठी 46 वनडे सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेय. त्याशिवाय 13 टी 20 सामन्यात तो भारतीय संघाचा सदस्य राहिला आहे.  2007 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याशिवाय दोन वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या कोलकाता संघाचा सदस्य राहिलाय. तसेच 2021 मध्ये धोनीच्या नेतृत्वात आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईच्या संघाचाही भाग राहिलाय. त्याशिवाय कर्नाटकसाठी त्यानं स्थानिक स्पर्धा जिंकल्या आहेत. रॉबिन उथप्पानं आयपीएलमध्ये तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे.  






देश आणि राज्याचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी मोठा सन्मान - उथप्पा 
रॉबिन उथप्पानं सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित निवृत्तीची घोषणा केली. आपल्या पोस्टमध्ये त्यानं देश आणि राज्याचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचं म्हटलेय. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये रॉबिन उथप्पा म्हणतो, देशाचं आणि राज्याचं प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान होय.  प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट व्हायला हवाच. मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान, मला पाठिंबा देणारे, बीसीसीआयचे अध्यक्ष, कर्मचारी, संघातील सहकारी, माझे प्रशिक्षक, आयपीएल संघ तसेच कर्नाटक क्रिकेट या सर्वांचे मी आभार मानतो.