Indian Cricketer Ishant Sharma Story : टीम इंडियाचा (Team India) अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने (Ishan Sharma) त्याच्या आयुष्यातील एक आठवण एका 10 वर्षांपूर्वीच्या प्रसंगातून सांगितली आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे झालेल्या वनडे सामन्यात पराभव झाल्यानंतर तो तब्बल महिनाभर रडत होता, असं त्याने स्वत: सांगितलं आहे. जवळपास महिनाभर त्याच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलताना रडून भावनांना वाट मोकळी करून देत असे, हे त्याने स्वत:च सांगितले.
तर 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्ये मोहालीत झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारतावर विजय मिळवण्यासाठी तीन षटकांत 44 धावांची गरज होती. ज्यावेळी इशांत शर्माने एकाच षटकात 30 धावा दिल्या होत्या. या महागड्या षटकानंतर ऑस्ट्रेलिया संघाला सहज विजय मिळवला होता. या पराभवाची सल इशांत शर्माच्या मनात अनेक दिवस होती.
'माझ्यामुळे संघ हरला ही खेदाची बाब'
क्रिकबझच्या 'राईज ऑफ न्यू इंडिया' शोमध्ये हा किस्सा सांगताना इशांत म्हणाला, '2013 साली मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला एकदिवसीय सामना हा माझा सर्वात वाईट सामना होता. माझ्या करिअरमध्ये यापेक्षा वाईट काळ आला असेल असं मला वाटत नाही. तो काळ खूप कठीण होता. मी खूप धावा दिल्या म्हणून संघाचा पराभव झाला. त्यावेळी मी माझ्या होणाऱ्या पत्नीला डेट करायचो आणि जेव्हाही मी तिच्याशी फोनवर बोलायचो तेव्हा देखील मी रडायचो. मला वाटतं की मी जवळपास एक महिना रडत होतो.
'सामन्यानंतर माही भाई आणि शिखर रूमवर आले'
यादरम्यान इशांतने त्याचा तक्तालीन कर्णधार एमएस धोनी आणि सलामीवीर शिखर धवन यांचाही उल्लेख केला. तो म्हणाला, 'त्या सामन्यानंतर एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे माही भाई आणि शिखर माझ्या खोलीत आले आणि त्यांनी सांगितले की तू चांगला खेळत आहेस.' त्या एका सामन्यामुळे मी एकदिवसीय क्रिकेटचा गोलंदाज नाही, असंही एक मत माझ्याबद्दल निर्माण झालं होतं, असंही इशांत म्हणाला.
सध्या सुरु ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
| सामना | तारीख | ठिकाण |
| पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
| दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
| तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
| चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
| पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
| दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
| तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
हे देखील वाचा-