IND vs AUS 2nd Test : भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले आहेत. पुजारा सध्या खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियासोबत आहे. दरम्यान या मालिकेत पुजारा नागपुरात त्याच्या कारकिर्दीतील 99 वी कसोटी खेळला. ज्यामुळे आता तो 100 वी कसोटी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याद्वारे पुजारा आपली 100 वी कसोटी खेळणार आहे. तर या सामन्यापूर्वी पुजाराची कारकिर्द आणि खास रेकॉर्ड्स पाहू...


आतापर्यंतच्या कारकिर्दीत पुजाराने हे खास विक्रम केले नावावर



  • 99 कसोटी सामन्यांसह पुजारा भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत 13 व्या क्रमांकावर आला आहे. भारताचा माजी खेळाडू मोहम्मद अझरुद्दीनही 99 कसोटी सामने खेळला असून पुजारा दिल्ली येथील सामना खेळून त्याचा रेकॉर्ड तोडेल. सचिन तेंडुलकर 200 कसोटी सामन्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

  • पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 7021 धावा केल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्यात पुजारा आठव्या क्रमांकावर आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली 7212 कसोटी धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर सचिन तेंडुलकर 15921 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

  • पुजाराच्या कसोटी कारकिर्दीत नाबाद 206 धावा ही एकाच डावातील मोठी धावसंख्या आहे. भारतासाठी कसोटी सामन्यात एकाच डावात सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत पुजारा 37व्या क्रमांकावर आहे. या यादीत वीरेंद्र सेहवाग 319 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

  • पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि 50 फलंदाजांना क्षेत्ररक्षण झेल किंवा धावचीत करत पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात यशस्वी झाला आहे.

  • पुजाराची कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी 44.15 आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या कसोटी सरासरीच्या बाबतीत पुजारा 11 व्या क्रमांकावर आहे. तर विनोद कांबळी 54.20 च्या सरासरीसह पहिल्या क्रमांकावर आहे.

  • भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा पुजारा हा 7वा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत एकूण 19 शतकं झळकावली आहेत.

  • भारतासाठी कसोटीत अर्धशतकं झळकावण्याच्या बाबतीतही पुजारा 7व्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत एकूण 53 अर्धशतकं केली आहेत.

  • सध्या खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पुजाराने 21 सामन्यांच्या 38 डावांमध्ये 52.77 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहेत. ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा पुजारा सहावा फलंदाज आहे.

  • पुजाराने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण 15 वेळा 50 चा आकडा पार केला आहे. ट्रॉफीमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा पुजारा चौथा फलंदाज आहे.

  • बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने एकूण 5 शतकं झळकावली आहेत. या ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा पुजारा आठवा फलंदाज ठरला आहे.


पुजाराची कारकिर्द थोडक्यात


ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये टीम इंडियासाठी पदार्पण करणार्‍या चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत करिअरमध्‍ये एकूण 99 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 169 डावात फलंदाजी करताना त्याने 44.15 च्या सरासरीने 7021 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 19 शतके आणि 34 अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 206 धावा आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 51 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-