Asia Cup :

  आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप (Asia Cup). यंदाच्या आशिया कप (Asia Cup 2023) जेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये रविवारी सामना होणार आहे.  दरम्यान या भव्य क्रिकेट स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ म्हटलं तर भारत (Team India) हा असून भारताने तब्बल 7 वेळा विजेतेपद मिळवलं आहे. 1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली भारताने चषक जिंकला आहे. 

पाच वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली भारताने चषक जिंकला असून यामध्ये सर्वात यशस्वी कर्णधार मोहम्मह अझराउद्दीन आणि एमएस धोनी हे आहेत. या दोघांनी देखील प्रत्येकी दोन वेळा भारताला कप जिंकवून दिला आहे. याशिवाय सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि रोहित शर्मा यांनीही एक-एकदा भारताला आशिया चषक मिळवून दिला आहे. तर नेमकी वर्षनिहाय यादी कशी आहे ते पाहूया...

वर्ष कर्णधार 
1984 सुनील गावस्कर
1988 दिलीप वेंगसरकर
1990/91 मोहम्मह अझराउद्दीन 
1995 मोहम्मह अझराउद्दीन 
2010 एमएस धोनी
2016 एमएस धोनी
2018 रोहित शर्मा

 

Asia Cup 2023 Final : आशिया चषाकाच्या जेतेपदासाठी भारत-श्रीलंका आठव्यांदा आमनेसामने, पाहा आतापर्यंत कोण वरचढ

आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका  1988 मध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. या स्पर्धेत भारताने बाजी मारली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आतापर्यंत सातवेळा आशिया चषकाची फायनल रंगली होती. यामध्ये भारताने चारवेळा बाजी मारली आहे. तर श्रीलंका संघाने तीन वेळा स्पर्धेवर नाव कोरलेय.  भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये  1991 दुसऱ्यांदा फायनल झाली होती, यामध्ये भारताने बाजी मारली. तिसऱ्यांदा 1995 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यामध्येही भारताने बाजी मारली होती. भारताने सलग तीन वेळा श्रीलंकेला हरवत आशिया चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर श्रीलंका संघाने पलटवार करत भारताला फायनलमध्ये सलग तीन वेळा जेतेपद पटकावले होते. 

श्रीलंकेचा पलटवार, भारताला तीन वेळा हरवले -

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यांमध्ये भारताने तीन वेळा विजय मिळवत हॅटट्रिक केली होती. त्यानंतर 1997, 2004 आणि 2008 मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध सलग तीन फायनल जिंकून हॅट्ट्रिक नोंदवली होती. मात्र, यानंतर दोघांमध्ये शेवटची विजेतेपदाची लढत 2010 मध्ये झाली, ज्यामध्ये भारताने विजय मिळवून आघाडी घेतली. आता २०२३ मध्ये हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. रविवारी होणाऱ्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  2023 मध्ये होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विजेतेपदाच्या लढतीत दोघांमध्ये बरोबरी होणार की भारत आघाडी कायम ठेवणार?

1988- भारत
1991- भारत
1995- भारत
1997- श्रीलंका
2004- श्रीलंका
2008- श्रीलंका
2010- भारत.