IND vs WI, 2nd Test LIVE : भारताने १-० ने मालिका जिंकली
IND vs WI, 2nd Test Live : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान आजपासून (20 जुलै) दुसऱ्या कसोटीला सुरुवात होत आहे.
पावसामुळे दुसरा कसोटी सामना अनिर्णित....
पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात पुन्हा पावसाची हजेरी
थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात.. ६७ षटकांचा खेळ होणार आहे.
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. पंच खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी मैदानावर आले आहेत. थोड्या वेळात सामन्याला सुरुवात होण्याची शक्यता
पावसामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया जाण्याची शक्यता
पाचव्या दिवसाच्या खेळाला उशीर होणार... पावसाचा व्यत्यय आलाय
पाचव्या दिवसाच्या खेळाला उशीर होणार... पावसाचा व्यत्यय आलाय
थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात... भारताला विजयासाठी आठ विकेटची गरज तर विडिंजला 289 धावांची गरज
IND vs WI 2nd Test, 4th Day Report : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पोर्ट ऑफ स्पेन कसोटीचा चौथा दिवस संपला. ही कसोटी आता रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आता शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला 289 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला विजयासाठी 8 विकेट्स घ्याव्या लागतील. तत्पूर्वी, भारताने 2 बाद 179 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. भारताकडून इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतके झळकावली.
पावसामुळे सामन्यात व्यत्यय... भारताची आघाडी 301 धावांची
यशस्वी जयस्वालच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसलाय. भारत दोन बाद १०६ धावा...
पावासाने विश्रांती घेतल्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताकडे जवळपास ३०० धावांची आघाडी
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्राच्या खेळाला अद्याप सुरुवात झालेली नाही
चौथ्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. या सत्रावर भारतीय संघाने वर्चस्व मिळावले. आधी वेस्ट इंडिजच्या संघाला लवकर तंबूत धाडले.. त्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा अर्धशतकानंतर बाद झाला. भारत एक बाद ९८ धावा
भारताला पहिला धक्का.. रोहित शर्मा अर्धशतकानंतर बाद...
रोहित शर्माने ३७ चेंडूत अर्धशतक झळकावल.. जयस्वाल ३१ धावांवर खेळत आहे. भारताची आघाडी २७३
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी टी २० स्टाईल फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. ३.३ षटकात ३५ धावा फलकावर लागल्या
यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा मैदनावर.. भारत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात
255 धावांवर वेस्ट इंडिजचा डाव आटोपला.. सिराजने पाच विकेट घेतल्या... भारताकडे १८३ धावांची आघाडी
वेस्ट इंडिजला नववा धक्का बसलाय. केमर रोच स्वस्तात बाद झालाय. सिराजने घेतली विकेट
मोहम्मद सिराजने अल्झारी जोसेफला बाद करत विडिंजला दिला आठवा धक्का.. भारताकडे १९४ धावांची आघाडी
जेसन होल्डर याला बाद करत सिरजने भारताला मोठं यश मिळवून दिले. वेस्ट इंडिज सात बाद २३३ धावा
एलिक एथांजे याच्या रुपाने वेस्ट इंडिजला सहावा धक्का बसला आहे. मुकेश कुमारने घेतली विकेट
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत तिसऱ्या दिवसावर वर्चवस्व मिळवले होते. आता थोड्याच वेळात चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे.
पुन्हा एकदा पावसामुळे सामना थांबवण्यात आलाय.
वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतलाय. जोशुआ डा सिल्वा बाद.. सिराजने घेतली विकेट
वेस्ट इंडिजला चौथा धक्का बसला आहे. ब्लॅकवूड २० धावांवर बाद झाला. जाडेजाने घेतली विकेट
आर. अश्विन याने भारताला तिसरे यश मिळवून दिले. अश्विनने ब्रेथवेट याला ७५ धावांवर तंबूत पाठवले. वेस्ट इंडिज तीन बाद १५७ धावा
वेस्ट इंडिजच्या कर्णधाराच संयमी फलंदाजी सुरु आहे. क्रेग ब्रेथवेट ६७ धावांवर खेळत आहे. विडिंज दोन बाद १४४ धावा
वेस्ट इ्ंडिजच्या कर्णधाराचे अर्धशतक
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिज दोन बाद ११७ धावा
सामन्यात पावसाचा व्यत्यय... वेस्ट इंडिज दोन बाद ११७ धावा
विडिंजला दुसरा धक्का बसला आहे. मुकेश कुमारने घेतली विकेट
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिजच दमदार सुरुवात
IND vs WI 2nd Test Match : तिसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात.. पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने 438 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजनेही दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने एक बाद 86 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने दमदार फलंदाजी केली. भारताकडे अद्याप ३५२ धावांची आघाडी आहे.
IND vs WI 2nd Test Match : पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने 438 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजनेही दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने एक बाद 86 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने दमदार फलंदाजी केली. भारताकडे अद्याप ३५२ धावांची आघाडी आहे. दुसरा दिवस भारताकडून विराट कोहली, रविंद्र जाडेजा आणि अश्विन यांनी गाजवला. विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. तर अश्विन आणि जाडेजा यांनी अर्धशतके ठोकली.
वेस्ट इंडिजला पहिला धक्का बसला आहे. रविंद्र जाडेजाने चंद्रपॉल याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
ब्रेथवेट आणि चंद्रपॉल यांनी दमदार सलामी दिली.. बिनबाद अर्धशतक झालेय.
क्रेग ब्रेथवेट आणि चंद्रपॉल यांनी संयमी सुरुवात केली आहे. १८ षटकात बिनबाद ३६ धावा
क्रेग ब्रेथवेट आणि चंद्रपॉल यांनी सावध सुरुवात केली... वेस्ट इंडिज बिनबाद १३ धावा
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 338 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने आपल्या 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दमदार शतक झळकावले. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल, अष्टपैलू रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन यांनी अर्धशतके ठोकली. वेस्ट इंडिजकडून केमर रोज आणि जोमल वॉरिकन यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर जेसन होल्डर याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले.
438 धावांवर भारताचा डाव आटोपला... ५६ धावांवर अश्विन बाद
आर. अश्विनचे अर्धशतक... ७५ चेंडूत झळकावले अर्धशतक
मोहम्मद सिराजच्या रुपाने भारताला नववा धक्का बसलाय... अश्विन ४४ धावांवर खेळत आहे.
भारताला आठवा धक्का बसलाय. जयदेव उनादकट बाद...
भारताने चारशे धावसंख्येचा पल्ला पार केला. भारत सात बाद ४०७ धावा
ईशान किशनच्या रुपाने भारताला सातवा धक्का बसला आहे.
रविंद्र जाडेजाच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसलाय. भारत सहा बाद ३६० धावा
भारताला पाचवा धक्का बसला... विराट कोहली १२१ धावांवर बाद
रविंद्र जाडेजाचे अर्धशतक झळकावले.. १०५ चेंडूमध्ये जाडेजाने अर्धशतक ठोकले.. यामध्ये चार चौकार लगावले
विराट कोहलीने 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरोधात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले. विराट कोहलीचे हे कसोटीमधील 29 वे शतक आहे. वनडे, टी २० आणि कसोटी असे एकूण ७६ वे कसोटी शतक झळकावले आहे.
विराट कोहली शतकाच्या जवळ पोहचलाय.. विराट कोहली ९७ धावांवर खेळत आहे तर रविंद्र जाडेजा ४८ धावांवर खेळत आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा मैदानावर आहेत. विराट कोहली ८९ तर तर जाडेजा ४३ धावांवर खेळत आहेत. भारत चार बाद २९७ धावा
पहिल्या दिवसाचा खेळ संपला... दिवसाअखेर भारत चार बाद २८८ धावा
विराट कोहलीचे दमदार अर्धशतक... १०६ चेंडूत सहा चौकाराच्या मदतीने झळकावले अर्धशतक... भारत चार बाद २४२ धावां
विराट कोहलची संयमी फलंदाजी सुरु आहे. विराट कोहली 44 धावांवर खेळत आहे. भारत चार बाद 222 धावा
भारताने चार विकेटच्या मोबदल्यात २०० धावांचा पल्ला पार केला. विराट कोहली आण रविंद्र जाडेजा मैदानावर आहेत.
अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला आहे. अजिंक्य रहाणे आठ धावा काढून बाद झाला. भारत चार बाद १८२ धावा
कर्णधार असताना रोहित शर्माने 150 षटकारांचा पल्ला पार केला.
रोहित शर्माने माजी कर्णधार एम एस धोनीचा विक्रम मोडला. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू झालाय.
जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच्या दोन हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू आहे. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराट कोहलीने 33 कसोटी सामन्यातील 55 डावात 1942 धावा चोपल्या आहेत.
रोहित शर्माने कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात वेगवान दोन हजार धावांचा पल्ला पार केला आहे. याआधी हा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर होता.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. लागोपाठ दोन सामन्यात शतकी भागिदारी करणारी सहावी सलामी जोडी ठरली आहे. याआधी भारताकडून विरेंद्र सेहवाग-मुरली विजय, सुनील गावसकर- फारुख इंजिनिअर, अंशुमन गायकवाड-सुनील गावसकर, अरुण लाल-सुनील गावसकर आणि सदगो्पन रमेश आणि देवांश गांधी यांचा क्रमांक लागतो. त्याशिवाय विदेशात लागोपाठ दोन शतकी भागिदारी करण्याचा विक्रमही रोहित आणि यशस्वीच्या नावावर झालाय.
भारताला तिसरा धक्का, कर्णधार रोहित शर्मा ८० धावांवर बाद झाला. भारत तीन बाद १५५ धावा
शुभमन गिलच्या रुपाने भारताला दुसरा धक्का.. दहा धावांवर गिल बाद झाला. भारत दोन बाद १५३ धावा
यशस्वी जयस्वालच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. यशस्वी जयस्वाल ५७ धावा काढून बाद झाला. १३९ धावांवर भारताला पहिला धक्का
रोहित शर्मापाठोपाठ यशस्वी जयस्वालचेही अर्धशतक... भारत बिनबाद १२१ धावा
रोहित शर्माचं दमदार अर्धशतक... भारत बिनबाद १०७ धावा... यशस्वी जयस्वाल ४० धावांवर खेळत आहे.
रोहित शर्मा आणि यशश्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. १४ षटकात ६४ धावांची भागिदारी केली.
रोहित-यशस्वीची संयमी सुरुवात... ८ षटकात ३२ धावांची भागिदारी
सामन्याला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा-यशस्वी जयस्वाल मैदानात
क्रॅग ब्रैथवेट (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, किर्क मॅकेंजी, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाज़, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमर रोच, जोमेल वारिकन, शैनन गेब्रियल
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनादकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मुकेश कुमारचं टीम इंडियात पदार्पण
पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओवल मैदानावर फलंदाजी करणं सोप्प आहे. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. सुरुवातीचे दोन दिवस खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असेल. त्यानंतर फिरकी गोलंदाजांना येथे मदत मिळेल.
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज – क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेगनारायण चंद्रपॉल, क्रिक मॅकेंजी, अलीक अथानाजे, जर्मेन ब्लॅकवूड, जोसुआ डी सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेयर, अल्जारी जोसेफ, केमार रोच, शैनन गॅब्रियल.
वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विडिंज खेळ उंचावण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. फलंदाज आणि गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले होते. तीन दिवसांमध्ये भारताने सामन्यात बाजी मारली होती. हा सामना भारताने एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या कसोटी सामना जिंकून क्लिन स्वीप देण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरले तर वेस्ट इंडिजचा संघ परतफेड करण्यासाठी खेळेल. पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल याने दीडशतकी खेळी केली होती. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा याने शतक तर विराट कोहलीने अर्धशतक झळकावले होते. गोलंदाजीत अश्विन याने 12 विकेट घेतल्या होत्या. तर रविंद्र जाडेजा यानेही भेदक मारा केला होता.
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज होणारा सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असेल. इतके सामने खेळणारा विराट कोहली दहावा खेळाडू होणार आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक सामने खेळला आह. सचिन तेंडुलकरने 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
विराट कोहलीने आतापर्यंत 499 सामन्यातील 558 डावात फलंदाजी करताना 53.48 जबरदस्त सरासरीने 25461 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 75 शतके आणि 131 अर्धशतके आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 254* इतकी आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 99 सामने झाले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजने 30 सामन्यात बाजी मारली आहे तर भारताला 23 सामन्यात विजय मिळाला आहे. 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.
India Vs West Indies 100th Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान आजपासून (20 जुलै) दुसऱ्या कसोटीला सुरुवात होत आहे. त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओवल येथे हा सामना होणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना खास असेल.. कारण, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना आहे. त्याशिवाय विराट कोहलीचा हा 500 आंतरराष्ट्रीय सामना असेल.
पार्श्वभूमी
India vs West Indies, Day 1 Live Score : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान आजपासून (20 जुलै) दुसऱ्या कसोटीला सुरुवात होत आहे. त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओवल येथे हा सामना होणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना खास असेल.. कारण, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना आहे. त्याशिवाय विराट कोहलीचा हा 500 आंतरराष्ट्रीय सामना असेल.
वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विडिंज खेळ उंचावण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. फलंदाज आणि गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले होते. तीन दिवसांमध्ये भारताने सामन्यात बाजी मारली होती. हा सामना भारताने एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या कसोटी सामना जिंकून क्लिन स्वीप देण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरले तर वेस्ट इंडिजचा संघ परतफेड करण्यासाठी खेळेल. पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल याने दीडशतकी खेळी केली होती. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा याने शतक तर विराट कोहलीने अर्धशतक झळकावले होते. गोलंदाजीत अश्विन याने 12 विकेट घेतल्या होत्या. तर रविंद्र जाडेजा यानेही भेदक मारा केला होता.
हेड टू हेड रिकॉर्ड
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 99 सामने झाले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजने 30 सामन्यात बाजी मारली आहे तर भारताला 23 सामन्यात विजय मिळाला आहे. 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.
संभावित प्लेइंग 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज – क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेगनारायण चंद्रपॉल, क्रिक मॅकेंजी, अलीक अथानाजे, जर्मेन ब्लॅकवूड, जोसुआ डी सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेयर, अल्जारी जोसेफ, केमार रोच, शैनन गॅब्रियल.
कधी आणि कुठे पाहाल सामना ?
दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. डीडी स्पोर्टस चॅनलवर लाईव्ह सामना पाहता येणार आहे. जिओ अॅपवर मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग असेल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्याबाबतचे अपडेट मिळतील.
पिच रिपोर्ट
विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना -
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज होणारा सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असेल. इतके सामने खेळणारा विराट कोहली दहावा खेळाडू होणार आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक सामने खेळला आह. सचिन तेंडुलकरने 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
विराट कोहलीने आतापर्यंत 499 सामन्यातील 558 डावात फलंदाजी करताना 53.48 जबरदस्त सरासरीने 25461 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 75 शतके आणि 131 अर्धशतके आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 254* इतकी आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी -
सचिन तेंडुलकर- 664 सामने.
महेला जयवर्धने- 652 सामने.
कुमार संगाकारा- 594 सामने.
सनथ जयसूर्या- 586 सामने.
रिकी पाँटिंग- 560 सामने.
महेंद्र सिंह धोनी- 538 सामने.
शाहिद आफ्रिदी - 524 सामने
जॅक कॅलिस- 519 सामने.
राहुल द्रविड- 509 सामने
इंजमाम उल हक- 500 सामने.
विराट कोहली- 499 सामने
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -