India vs West Indies T20 Seires Schedule And Teams : कसोटी आणि वनडे सामन्याच्या मालिकेनंतर आता टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन ऑगस्टपासून पाच सामन्याची टी २० मालिका सुरु होणार आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाने 1-0 ने बाजी मारली होती. तर वनडे मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली होती. आता तीन ऑगस्टपासून टी २० च्या थराराला सुरुवात होणार आहे. 


टी २० मालिकेत भारतीय संघात सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यासारखे सिनिअर खेळाडूंना आराम दिलाय. हार्दिक पांड्या नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघात काही अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टी २० साठी वेस्ट इंडिजचे खेळाडू ओळखले जातात. त्यामुळे ही मालिका रंगतदार होण्याची शक्यता आहे. 


सामन्यांची वेळ काय ?


तीन ऑगस्टपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल..


कुठे पाहाल सामने -


हा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. याव्यतिरिक्त सामना मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर मोफत पाहता येऊ शकतो. फॅनकोडवरही सामना पाहता येईल. एबीपी माझाच्या संकेतस्थाळवरही सामन्याबाबत तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.


पाच सामन्याच्या टी २० मालिकेसाठी दोन्ही संघात कोण कोणते शिलेदार.... india vs west indies t20 squad


वेस्ट इंडिजचा संघात कोण कोण ?


रोवमन पॉवेल (कर्णधार), काईल मेयर्स (उप कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅक्कॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशेने थॉमस.


टी20साठी भारतीय संघ -


इशान किशन (विकेटकिपर) , शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार


पाच सामन्याच्या टी२० मालिकेचं वेळापत्रक काय ? india vs west indies t20 schedule : - 


टी 20 सामने (संध्याकाळी 8 वाजता)


3 ऑगस्ट 2023 - पहिला टी20 सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद


6 ऑगस्ट 2023 - दुसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना


8 ऑगस्ट 2023 - तिसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना


12 ऑगस्ट 2023 - चौथा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा 


13 ऑगस्ट 2023 - पाचवा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा