India vs West Indies 1st T20, Playing XI: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात टी20 मालिका आज सुरु होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर आता टी20 सामन्यांना सुरुवात होत आहे. तीन  एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 ने विजय मिळवला. एकदिवसीय मालिकेत दिग्गज खेळाडू संघात नव्हते. पण आता कर्णधार रोहितसह दिग्गज खेळाडू संघात आले असून आज नेमका संघ कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Continues below advertisement

सर्वात मोठा बदल म्हणजे या दौैऱ्यात भारताचा दिग्गज फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) संघात परतला आहे. मागील बराच काळ दुखापतीमुळे संघाबाहेर असणारा कुलदीप आता बऱ्याच काळानंतर संघात परतला आहे. त्यामुळे त्याला अंतिम 11 मध्ये आज संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय हर्षल पटेलही काही महिन्यानंतर आता मैदानात उतरेल तर नेमकी अंतिम 11 कशी असू शकते हे पाहूया...

संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), अक्षर पटेल, हार्दीक पांड्या, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान

Continues below advertisement

आजचा सामना होणाऱ्या मैदानात हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असला तरी कॅरेबियान प्रीमियर लीगचे (CPL) सामने याठिकाणी झाले असून त्या सामन्यांच्या आधारे याठिकाणची मैदानाची स्थिती सांगतिली जाऊ शकते. त्यानुसार ही खेळपट्टी गोलंदाजांना आणि फलंदाजांना दोघांना बऱ्यापैकी मदत देऊ शकते.  याआधी येथे झालेल्या टी20 सामन्यांत 7.40 च्या इकोनॉमी रेटने रन झाले आहेत. ज्यामुळे आजही एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.

हे देखील वाचा -