IND vs WI 1st T20 : वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताकडून तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांनी भारतीय संघातून पदार्पण केलेय. उमरान मलिक, रवि बिश्नोई यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले नाही. भारतीय संघात तीन फिरकी गोलंदाजांना स्थान देण्यात आलेय. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव एकत्र खेळणार आहेत. वेस्ट इंडिजचा संघ सहा फलंदाजांसह मैदानात उतरला आहे. तर भारतीय संघात तीन फिरकी गोलंदाज आहेत.
2024 च्या टी20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने तयारी सुरु केली आहे. विश्वचषकाला जास्त वेळ शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आतापासूनच तयारी सुरु केली आहे. युवा खेळाडूंना घेऊन संघाची बांधणी केली जात आहे. युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी दिली जाणार असल्याचे हार्दिक पांड्या याने नाणेफेकीवेळी सांगितले.
भारतीय संघात कोण कोणते शिलेदार -
शुभमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युदवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार
वेस्ट इंडिजच्या संघात कोण कोणते शिलेदार ?
काइल मेयर्स, जोन्सन चार्लस, शिमरोन हेटमायर, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, रोवमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, आर. शेफर्ड, अकिल हुसेन, अल्जारी जोसेफ, ओबेद मैकॉय.
भारताचा 200 वा सामना -
भारतीय संघ आज आपला 200 वा टी 20 सामना खेळत आहे. भारताशिवाय फक्त पाकिस्तान संघाने 200 टी20 सामने खेळले आहेत. 2006 मध्ये सुरु झालेला प्रवास अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत या कालावधीत भारतीय संघाने अनेक विक्रम केले आहेत. भारतीय संघाने टी20 चा पहिला विश्वचषक जिंकला होता.
हेड टू हेड
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 25 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 7 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे.