Ind vs UAE Update : आधी कुलदीपचा विकेट्चा 'चौकार', नंतर अभिषेकचा तडाखा! टीम इंडियाने 27 चेंडूत सामना जिंकला, युएईचा 9 विकेट्सने पराभव

Asia Cup 2025 Ind vs UAE Update : टी-20 आशिया कप 2025 मध्ये भारत आणि यूएई यांच्यात सामना खेळला गेला.

Advertisement

किरण महानवर Last Updated: 10 Sep 2025 10:06 PM

पार्श्वभूमी

India vs UAE Asia Cup 2025 Live Score Update : आज टी-20 आशिया कप 2025 मध्ये भारत आणि यूएई यांच्यात सामना रंगणार आहे. गट अ मधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय...More

Ind vs UAE Live Score Update : आधी कुलदीपचा विकेट्चा 'चौकार', नंतर अभिषेकचा तडाखा! टीम इंडियाने 27 चेंडूत सामना जिंकला, युएईचा 9 विकेट्सने पराभव

भारताने आशिया कप 2025 मध्ये विजयाने सुरुवात केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने संयुक्त अरब अमिराती (यूएई) ला नऊ विकेट्सने पराभूत केले आणि चालू स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, यूएई संघ 13.1 षटकांत केवळ 57 धावा करू शकला. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने 4.3 षटकांत म्हणजेच फक्त 27 चेंडूंत एक विकेट गमावून 60 धावा करून सामना जिंकला. भारताकडून अभिषेक शर्माने 16 चेंडूंत 30 धावा केल्या. त्याच वेळी, शुभमन गिल (20) आणि सूर्यकुमार यादव (7) नाबाद राहिले. यूएईकडून जुनैद सिद्दीकीने एक विकेट घेतली. त्याआधी, भारतीय संघाकडून कुलदीप यादवने चार आणि शिवम दुबेने तीन विकेट घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.