Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka : अटीतटीच्या लढतीत पाकस्तानचा पराभव करत श्रीलंका संघाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल होणार आहे. त्यापूर्वीच श्रीलंकाला संघासाठी चिंतेची बातमी समोर आली. श्रीलंका संघाचा स्टार गोलंदाज महिश तिक्ष्णा दुखापतग्रस्त झालाय. पाकिस्तानविरोधातील सामन्यात तिक्ष्णाला दुखापत झाली होती. सामन्यावेळी तिक्ष्णा याने वारंवार मैदान सोडले होते.  तिक्ष्णाबाबत आद्याप मेडिकल अपडेट समोर आलेले नाही. पण फायनलपूर्वी श्रीलंकेला हा मोठा धक्का मानला जातोय. 


पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोमध्ये रंगतदार सामना झाला. या सामन्यात श्रीलंका संघाने शानदार प्रदर्शन करत विजय मिळवला. या विजयासह श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश निश्चित केलाय. या सामन्यात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महिश तिक्ष्णा दुखापतग्रस्त झालाय. तिक्ष्णा याने आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत पाच सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. तिक्ष्णाच्या माऱ्यामुळे श्रीलंकेची फिरकी गोलंदाज मजबूत भासते. पण आता प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाल्यामुळे श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या आहेत. 


दरम्यान, श्रीलंका संघाने स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. गतविजेत्या श्रीलंका संघाने पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रलंका संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पाच विकेटने पराभव केला होता. त्यानंतर आफगाणिस्तानला दोन धावांनी हरवले होते. पण सुपर ४ मध्ये श्रीलंका संघाला भारताविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता.  भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. श्रीलंकाला संघाला फायनलमध्ये भारताचा पराभव करणं कठीण जाणार आहे. श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानावर खेळत असला तरी भारतीय संघ तुफान फॉर्मात आहे. सुपर ४ सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताला २१३ धावांत रोखले होते. पण फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. श्रीलंकेचा संपूर्ण डाव १७२ धावांवर संपुष्टात आला होता.  


टीम इंडिया श्रीलंका यांच्यात फायनल -  - 


आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-4 च्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेनं (Sri Lanka) पाकिस्तानचा (Pakistan) 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये लढत होणार आहे. डीएलएसच्या नियमांनुसार, या सामन्यात श्रीलंकेसमोर 252 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी केवळ 42 षटकांत पूर्ण केलं. संघाच्या या विजयात कुसल मेंडिसनं फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावत 91 धावांची शानदार खेळी केली, तर चारिथ असलंकानंही 49 नाबाद धावा केल्या. आता 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा संघ टीम इंडियाविरुद्ध जेतेपदाच्या लढतीत खेळणार आहे.