Asia Cup 2023 Pakistan Ranking : आशिया चषकाच्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तान संघाला श्रीलंकेकडून दोन विकेटने निसटता पराभव स्वीकारावा लागला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. श्रीलंकेच्या विजयामुळे पाकिस्तान संघाचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलेय. हा पराभव पाकिस्तानला अधिकच जिव्हारी लागला आहे. कारण, भारत आणि श्रीलंका यांच्याकडून लागोपाठ दोन सामन्यात झालेल्या पराभवाचा फटका पाकिस्तानला बसलाय. आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानची घसरण झाली आहे. पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानावर घसरलाय. दुसरीकडे भारतीय संघाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय संघाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरलाय. पाकिस्तान संघाकडे 3102 पॉइंट्स आणि 115 रेटिंग आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या टीम इंडियाकडे 4516 पॉइंट्स आणि 116 रेटिंग गुण आहेत. पहिल्या स्थानावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे 3061 पॉइंट्स आणि 118 रेटिंग गुण आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आघाडीच्या पाच संघामध्ये आह. इंग्लंडचा संघ चौथ्या तर न्यूझीलंड पाचव्या स्थानावर विराजमान आहे.
टीम इंडिया श्रीलंका यांच्यात फायनल - -
आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-4 च्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेनं (Sri Lanka) पाकिस्तानचा (Pakistan) 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये लढत होणार आहे. डीएलएसच्या नियमांनुसार, या सामन्यात श्रीलंकेसमोर 252 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी केवळ 42 षटकांत पूर्ण केलं. संघाच्या या विजयात कुसल मेंडिसनं फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावत 91 धावांची शानदार खेळी केली, तर चारिथ असलंकानंही 49 नाबाद धावा केल्या. आता 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा संघ टीम इंडियाविरुद्ध जेतेपदाच्या लढतीत खेळणार आहे.
आशिया चषकात टीम इंडिया अजिंक्य -
टीम इंडियाने आशिया चषकात आतापर्यंत अजेय आहे, एकाही सामना गमावला नाही. पहिला सामना रद्द झाला. यानंतर नेपाळविरुद्ध १० गडी राखून विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला 238 हरवले. यानंतर श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव झाला. टीम इंडियाचा पुढील सामना आता बांगलादेशशी होणार आहे. तर अंतिम फेरीत श्रीलंकेशी दोन हात करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :