IND vs SL: भारतीय क्रिकेट संघ 22 जुलै रोजी श्रीलंकेला रवाना झाला. टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची (Gautam Gambhir) ही पहिली मालिका असणार आहे. गौतम गंभीर श्रीलंकेत पोहोचताच ॲक्शनमध्ये आला असून बीसीसीआयने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.






सदर व्हिडिओमध्ये गंभीर संजू सॅमसनला फलंदाजीच्या टिप्स देताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. झिम्बाब्वेविरोधात संजू सॅमसनने  2 डावात अर्धशतकासह 70 धावा केल्या.बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचे सराव सत्र दाखवण्यात आले आहे. यावेळी गौतम गंभीर संजू सॅमसनला फलंदाजीबाबत काही गुरुमंत्र देताना दिसला. गौतम गंभीर सॅमसनला ऑफ साइडमध्ये खेळण्याच्या पद्धतीबद्दल काहीतरी सांगत आहेत.






प्लेइंग इलेव्हनमधील संजू सॅमसनचे स्थान धोक्यात-


संजू सॅमसनची टी-20 संघात निवड झाली असली तरी ऋषभ पंतच्या रूपाने संघात यष्टीरक्षक फलंदाज आधीच आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसनला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ठेवण्यात येईल की नाही हे स्पष्ट झालेले नाही. संजू सॅमसनने 2015 मध्ये वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेल्या 9 वर्षात संजू सॅमसन टीम इंडियासाठी केवळ 28 सामने खेळू शकला आहे. या 28 सामन्यांच्या 24 डावात त्याने 444 धावा केल्या आहेत. संजू सॅमसन हा तोच खेळाडू आहे जो 2017 पासून आयपीएलच्या प्रत्येक हंगामात 300 हून अधिक धावा करत आहे. संजू सॅमसनच्या कामगिरीत सातत्य आहे. मात्र त्याला टीम इंडियात हवी तशी संधी मिळालेली नाही. 


श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ-


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.


भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक-


27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)


28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)


30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)


2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)


4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)


7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)


संबंधित बातमी:


भारतविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेने जाहीर केला संघ; दोन दिग्गज खेळाडू परतले, मॅथ्यूजला डच्चू