IND vs SL 2nd Test Live: भारताचा दुसरा डाव सुरु, सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

India vs Sri Lanka 2nd Test Score Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळवला जात आहे.

abp majha web team Last Updated: 13 Mar 2022 04:33 PM
IND vs SL : दिवसाचा खेळ आटोपला, श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची गरज

दुसऱ्या दिवशीच्या अखेरीस श्रीलंकेची अवस्था 28 वर 1 बाद असल्याने त्यांना विजयासाठी 419 धावा तर भारताला विजयासाठी 9 विकेट्सची गरज आहे. 

IND vs SL: बुमराहची तोफ धडाडली, शून्यावर श्रीलंकेचा सलामीवीर बाद

बुमराहने पहिल्याच षटकात लाहिरु याला पायचीत करत तंबूत धाडलं आहे.

IND vs SL : भारताकडून डाव घोषित, 446 धावांची आघाडी

भारतानं डाव घोषित केला असून 9 विकेट्स गमावत 303 रन भारताने केले असून श्रीलंकेला विजयासाठी 446 धावा करायच्या आहेत. 

IND vs SL : भारताचा सहावा गडी बाद, जाडेजा आऊट

रवींद्र जाडेजा 22 धावा करुन तंबूत परतला आहे. फर्नांडोने त्याला बाद केलं आहे.

IND vs SL : श्रेयस अय्यरचं अर्धशतक पूर्ण

श्रेयसनं पुन्हा एक उत्तम खेळी करत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

IND vs SL : सामन्यात लंचब्रेक, भारत 199/5 बाद

भारताने लंचब्रेकपूर्वी 342 धावांची आघाडी घेत 199 धावा केल्या आहेत.


 





IND vs SL : अर्धशतक करुन पंत बाद

अर्धशतक झळकावल्यानंतर पंत पुढील काही चेंडू खेळून तंबूत परतला आहे. 

IND vs SL : पंतचं 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण

ऋषभ पंतने धमाकेदार खेळी करत 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. भारतासाठी हे सर्वात जलद अर्धशतक आहे.

IND vs SL : कोहली तंबूत परत

विराट कोहलीने आजही निराशाच केली असून 13 धावा करुन तो पायचीत झाला आहे. 

IND vs SL : भारताला तिसरा झटका, विहारी बाद

35 धावा करुन हनुमा विहारी तंबूत परतला आहे. 

IND vs SL : 46 धावा करुन रोहित बाद, विराट क्रिजवर

कर्णधार रोहित शर्मा डी सिल्वाच्या ओव्हरमध्ये झेलबाद झाला आहे. 46 धावा करुन तो तंबूत परतला आहे.

IND vs SL : विहारी-शर्माची अर्धशतकी भागिदारी

हनुमा विहारी आणि रोहित शर्मा यांच्या 50 धावांची पार्टनरशिप पूर्ण झाली आहे.


IND vs SL : विहारीसह रोहित शर्मा क्रिजवर

भारताचा सलामीवीर मयांक बाद झाल्यानंतर सध्या कर्णधार रोहितने हनुमा विहारीसोबत संघाचा डाव सावरला आहे.

पार्श्वभूमी

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली.


ज्यानंतर भारतीय फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. पण श्रेयस अय्यरच्या 92 धावांनी भारतीय संघाचा डाव 252 पर्यंत पोहोचवला. ज्यानंतर भारतीय संघाला 252 धावांत बाद केल्यानंतर प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाची फलंदाजीही ढासळली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. एँजलो मॅथ्युजचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. मॅथ्युजने 43 धावांची खेळी केली. दिमुथ करुणारत्ने 4, लाहिरू थिरिमाने 8, कुसल मेंडिस 2, धनंजया डी सिल्वा 10 आणि चरिथ असलंका 5 यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. निरोशन डिकवेला 13 आणि लसिथ एम्बुल्डेनिया शून्य धावसंख्येवर नाबाद आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामीला दोन तर अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. दुसऱ्या दिवशी भारताने आणखी उत्तम गोलंदाजी करत 109 धावांत श्रीलंकेच्या संघाला गुंडाळले असून भारताने त्यानंतर दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली.


भारताचा कसोटी संघ:
मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (कर्णधार), हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.


श्रीलंकेचा कसोटी संघ
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.