IND VS SA 2nd Test : भारताचा सर्वात मोठा कसोटी पराभव! दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटी 408 धावांनी जिंकली, मालिका 2-0 ने घातली खिशात
IND VS SA 2nd Test Day 5 Live Update Marathi : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा आज निर्णायक दिवस आहे.
किरण महानवर Last Updated: 26 Nov 2025 12:41 PM
पार्श्वभूमी
India vs South Africa 2nd Test Day 5 Match Live Scorecard : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा आज निर्णायक दिवस आहे. सामना वाचवायचा असेल...More
India vs South Africa 2nd Test Day 5 Match Live Scorecard : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा आज निर्णायक दिवस आहे. सामना वाचवायचा असेल तर टीम इंडियाला अखेरच्या दिवशी पूर्ण 90 षटके तग धरून 8 विकेट वाचवाव्या लागणार आहेत. तर आधीच मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला केवळ 8 विकेटची गरज आहे.चौथ्या दिवसाच्या अखेरीस 549 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 27 धावांवरच दोन्ही सलामीवीर गमावले. नाईट वॉचमन म्हणून आलेला कुलदीप यादव 4 धावांवर, तर साई सुदर्शन 2 धावांवर नाबाद आहेत. यापूर्वी यशस्वी जैस्वाल 13 आणि के.एल. राहुल 6 धावा करत बाद झाले.सामन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा ठोकल्या, तर भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 201 धावांवर गारद झाला. त्यानंतर आफ्रिकन कर्णधार बावुमा यांनी भारताला फॉलो-ऑन न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात त्यांनी 5 बाद 260 धावांवर डाव घोषित करत भारतासमोर 549 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले.कोलकात्यातील पहिला कसोटी भारत 30 धावांनी हरला होता. त्यामुळे मालिकेत टिकून राहण्यासाठी या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणे हा एकमेव पर्याय उरला आहे. परंतु परिस्थिती पाहता ते कठीण वाटत आहे. क्लीन स्वीप टाळायचा असेल तर भारताला हा सामना ड्रॉ करावा लागणार आहे. एकंदरित, जगज्जेता दक्षिण आफ्रिका भक्कम स्थितीत असून मालिकेची विजेतेपद त्यांच्या एकहाती दिसत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND VS SA 2nd Test : भारताचा सर्वात मोठा कसोटी पराभव! दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटी 408 धावांनी जिंकली, मालिका 2-0 ने घातली खिशात
भारताला घरच्या मैदानावर आणखी एक मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटी 408 धावांनी जिंकली आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला.
दक्षिण आफ्रिकेने कोलकाता कसोटी 30 धावांनी जिंकली.
दक्षिण आफ्रिकेने 549 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
जागतिक कसोटी विजेत्या संघाने दुसऱ्या डावात भारताला 140 धावांत गुंडाळले आणि 408 धावांनी विजय मिळवला.
हा भारताचा कसोटीतील आणि घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव आहे.
याआधी 2004 मध्ये नागपूरमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने 342 धावांनी पराभव केला होता.