IND vs SA 2nd Test Score Live: दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 7 विकेट्सनी विजय, एल्गारच्या नाबाद 96 धावा
India vs South Africa 2nd Test Live Updates: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा चौथ्या दिवशीचा खेळ सध्या सुरु झाला आहे.
दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने दमदार खेळाचे दर्शन घडवत 7 विकेट्सनी विजय मिळवला आहे. यावेळी एल्गार याने नाबाद 96 धावा झळकावत महत्त्वपूर्ण खेळी केली.
विजयाच्या हळूहळू जवळ पोहोचणारी दक्षिण आफ्रिका टीमने तिसरा विकेट गमावला आहे. डस्सेन याला 40 धावांवर शमीने बाद केंल आहे.
52 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 174 झाला असून त्यांना विजयासाठी आता केवळ 66 धावांची गरज आहे. यावेळी त्यांच्या हातात 8 विकेट्सही आहेत.
52 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 174 झाला असून त्यांना विजयासाठी आता केवळ 66 धावांची गरज आहे. यावेळी त्यांच्या हातात 8 विकेट्सही आहेत.
डीन एल्गरने अर्धशतकी खेळी केली आहे. एल्गरने 132 चेंडूचा सामना करताना 53 धावा केल्या आहेत.
पावसाच्या संकटामुळे चौथ्या दिवशीचा खेळ होत नव्हता. पण अखेर पाऊस थांबल्यामुळे 34 षटकं खेळवण्यात येणार आहेत.
पार्श्वभूमी
India vs South Africa 2nd Test Live Updates: पावसाच्या विलंबानंतर अखेर चौथ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आहे. काही सेशन रद्द झाल्यामुळे 34 ओव्हर्सचा खेेळ होणार आहे. सध्यातरी या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं पारडं सध्या जडं दिसत आहे. कारण तिसऱ्या दिवसाअखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 40 षटकांत 2 विकेट्स गमावून 118 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी केवळ 122 धावांची गरज आहे. यामुळं हा कसोटी सामना निर्णायक वळणावर आहे. चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असून आफ्रिका उर्वरित 122 धावा करणार की भारताचे गोलंदाज शिल्लक आठ विकेट्स घेऊन ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करतील? हे पाहणे रंजक ठरेल..
आतापर्यंत कसोटी
आतापर्यंत सामन्यात पहिल्यादिवशी भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीला सुरुवात केली असता पहिल्या दिवशीच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका संघाने 1 विकेट गमावत 35 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर शार्दूलने आफ्रिकेचे तीन गडी पटापट बाद केले. पण त्यानंतर बावुमा आणि काईल या जोडीने डाव सावरला आणि धावसंख्या 160 च्या पुढे पोहोचवली. पण 162 धावांवर काईल बाद होताच 177 धावांवर बावुमाही बाद झाला. नंतर लगेचच शमीने रबाडालाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मार्को आणि महाराज यांनी आठव्या गड्यासाठी काही धावा केल्या पण महाराजला बुमराहने (Jasprit Bumrah) बाद करताच शार्दूलने अखेरचे दोन गडी बाद करत आफ्रिकेला 229 धावांत सर्वबाद केलं. त्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात 266 धावा केल्या.
संघ:
दक्षिण आफ्रिकेचा संघ: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.
भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -