IND vs SA 2nd Test Score Live: दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारत 85/2, 58 धावांची आघाडी
India vs South Africa 2nd Test Live Updates: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा दुसऱ्या दिवशीचा खेळ सध्या सुरु आहे.
दुसऱ्या दिवशीच्या अखेरीस भारताने 85 धावा करत 2 विकेट गमावले आहेत. सध्या पुजारा आणि रहाणे खेळत असून भारताकडे 58 धावांची आघाडी आहे.
भारताचा सलामीवीर मयांक अगरवाल 23 धावा करुन बाद झाला आहे. आलीवियरने त्याला पायचीत केलं आहे.
भारताच्या डावाची सुरुवात होताच दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅन्सनने महत्त्वाचा गडी केएल राहुलला बाद केलं आहे.
अखेरचे दोन विकेट्स शार्दूल ठाकूरने घेत दक्षिण आफ्रिकेला 229 धावांवर रोखलं आहे. त्यामुळे आफ्रिकेकडे 27 धावांची आघा़डी असून आता भारत फलंदाजी करत आहे.
दक्षिण आफ्रिका संघाने आघाडी घेतल्यानंतर त्यांचा आठवा गडी तंबूत परतवण्यात भारताला य़श आलं आहे. बुमराहने महाराज याला बाद केलं आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात चहापानाचा ब्रेक झाला आहे. आफ्रिका 191 वर 7 बाद अशा अवस्थेत आहे.
शार्दूलने बावुमाला बाद करत 5 विकेट पूर्ण केल्यानंतर शमीने रबाडाला बाद करत सातवी विकेट मिळवली आहे.
बराच वेळ क्रिजवर टिकलेल्या बावुमा-काईल जोडीला फोडण्यात भारताला यश आलं आहे. शार्दूलने दिवसातील चौथी विकेट घेत काईलला 21 धावांवर बाद केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या दिवशी सुरुवातीला तीन विकेट गमावल्यानंतर मात्र चांगला खेळ दाखवण्यास सुरुवात केली आहे. काईल आणि बावुमा जोडी उत्तम खेळ करत असून लवकरच भारताच्या पुढे निघण्याची दाट शक्यता आहे.
लंच ब्रेकनंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज क्रिजवर आले असून टेम्बा आणि काईल हे दोघे फलंदाजी करत आहेत. 51 धावानंतर आफ्रिकेचा स्कोर 129 वर 4 बाद आहे.
दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यापासून भारताचा युवा स्टार शार्दूल ठाकूरने भेदक गोलंदाजी करत तीन बळी पटकावले आहेत. त्याने एल्गार, पीटरसन आणि डस्सेन यांना बाद केलं आहे.
पार्श्वभूमी
India vs South Africa 2nd Test Live Updates: सरत्या वर्षांला धडाकेबाज कसोटी विजयासह निरोप दिल्यानंतर नव्या वर्षांत ऐतिहासिक शिखर सर करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. सेंच्युरिअन येथे झालेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारतानं 113 धावांनी दणदणीत विजय मिळवून तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर झालाय. त्याच्याऐवजी भारताचा सलामीवीर केएल राहुल भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करत आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटीत पहिल्यादिवशी भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीला सुरुवात केली असता पहिल्या दिवशीच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका संघाने 1 विकेट गमावत 35 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आहे.
कसा होता पहिला दिवस
सामन्याची सुरुवात होताच भारताचे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. सलामीवीर मयांक 26 धावांवर बाद होताच पुजारा (3) आणि रहाणे (0) लगेच बाद झाले. मग पुढील खेळाडूही पटपट बाद झाले. दरम्यान आश्विनने मात्र धडाकेबाज 46 धावा झळकावल्या ज्यामुळे भारताचा डाव काहीसा सावरला. अखेर बुमराहने दोन चौकार आणि एक षटकार ठोकत 11 चेंडूत 14 धावा केल्या. ज्यामुळे भारताचा 200 धावांचा आकडा पार झाला. 202 धावांवर भारता पहिला डाव संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने फलंदाजीची सुरुवात केली. यावेळी चौथ्याच ओव्हरमध्ये शमीने मार्करमला पायचीत करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पण नंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत एल्गर आणि पीटरसन यांनी क्रिजवर टीकून राहत 35 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
संघ:
दक्षिण आफ्रिकेचा संघ: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.
भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -