India vs South Africa 2nd Test Live Updates: भारताची स्थिती खराब, 50 धावांच्या आतच 3 गडी बाद

India vs South Africa 2nd Test Live Updates: सेंच्युरिअन येथे झालेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारतानं 113 धावांनी दणदणीत विजय मिळवून तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय.

abp majha web team Last Updated: 03 Jan 2022 02:44 PM
दिवसअखेर भारताकडे 167 धावांची आघाडी

पहिल्या दिवशीचा खेळ संपला असून भारताने 202 धावा केल्यानंतर सध्या दक्षिण आफ्रिका फलंदाजी करत आहे. दिवसअखेर त्यांच्या 35 धावा झाल्या असून एक गडी तंबूत परतला आहे.

शमीकडून मार्करमची शिकार, दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका

मोहम्मद शमीने मार्करमला बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे.

202 धावांवर पहिला डाव आटोपला

भारताचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला आहे. आता दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फलंदाजीला मैदानावर उतरतील

आश्विनचं अर्धशतक हुकलं, 46 धावांवर बाद

शेवटच्या फळीत खेळातानाही उत्तम फलंदाजी करणाऱ्या आश्विनची झुंज संपुष्टात आली आहे. 46 धावांवर तो बाद मार्कोच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे.

भारताला आठवा झटका, शमी बाद

भारताचा आठवा गडी मोहम्मद शमीच्या रुपात तंबूत परतला आहे. 185 धावांवर भारताचे 8 विकेट्स पडले आहेत.

खाते न खोलताच शार्दूल बाद

भारताचा युवा अष्टपैलू शार्दूल ठाकूर खाते न खोलताच तंबूत परतला आहे. किगन पीटरसनने ऑलीवियरच्या चेंडूवर त्याचा झेल घेतला आहे.

पंतही बाद, मार्को जेन्सनला तिसरं यश

भारताचा सहावा गडी ऋषभ पंतच्या रुपात तंबूत परतला आहे. मार्को जेन्सनने त्याला बाद केलं आहे. 17 धावा करुन पंत बाद झाला आहे.

भारताचा निम्मा संघ तंबूत परत

कर्णधार केएल राहुल बाद झाला असून भारताचे 5 गडी तंबूत परतले आहेत. सध्या पंत आणि आश्विन क्रिजवर आहेत.

केएल राहुलचं संयमी अर्धशतक

कर्णधार केएल राहुलने एकहाती गड लढवत अर्धशतक पूर्ण केलं आहे. सध्या त्याच्या जोडीला ऋषभ पंत मैदानावर आहे.

100 धावांचा टप्पा पूर्ण

भारताचे फलंदाज बाद होत असले तरी कर्णधार राहुल टिकून खेळत असल्याने अखेर भारतानं 100 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

भारताला चौथा झटका, हनुमा विहारी बाद

बऱ्याच काळानंतर संधी मिळालेल्या हनुमा विहारीने एक विश्वासू खेळी दाखवत भारताचा डाव सावरण्यास सुरुवात केली होती. पण रबाडाच्या चेंडूवर 20 धावा करुन विहारी झेलबाद झाला आहे.

लंचब्रेकपूर्वीच भारताचे 3 गडी तंबूत

दुसऱ्या कसोटीत भारताची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. भारताचे तीन गडी 50 धावांच्या आतच तंबूत परतले आहेत. सध्या केएल राहुल (19) आणि हनुमा विहारी (4) क्रिजवर आहेत.

Mayank Agarwal: भारताला पहिला झटका, मयांक अग्रवाल बाद

भारतीय संघाला पहिला झटका लागला असून मयांक अग्रवाल 26 धावा करून बाद झालाय. भारताचा स्कोर- 37/1 (15.3) 


 

Ind vs SA 2nd Test Live Updates : भारतानं टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

जोहान्सबर्ग कसोटी मालिकेत भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारताचा कर्णधार विराट कोहली या सामन्यातून बाहेर पडल्याने केएल राहुल संघाचं नेतृत्व करणार आहे. 


 


 

पार्श्वभूमी

India vs South Africa 2nd Test Live Updates: सरत्या वर्षांला धडाकेबाज कसोटी विजयासह निरोप दिल्यानंतर नव्या वर्षांत ऐतिहासिक शिखर सर करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. सेंच्युरिअन येथे झालेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारतानं 113 धावांनी दणदणीत विजय मिळवून तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर झालाय. त्याच्याऐवजी भारताचा सलामीवीर केएल राहुल भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. आजपासून सुरु होणारा दुसरा कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या विजय मिळवून मालिका खिशात घालण्यासाठी बाहेर संघ मैदानात उतरणार आहे. तर, भारताला पराभूत करून मालिका वाचवण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल.
 
भारतानं  1992 पासून दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकता आली नाही. आजचा सामना जिंकून भारतीय संघाकडं इतिहास रचण्याची मोठी संधी उपलब्ध झालीय. ही संधी भारतीय संघ गमावणार नाही, अशी अपेक्षा केली जात आहे.  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यश संपादन करून आफ्रिकन भूमीत प्रथमच कसोटी मालिका विजय साकारण्याची ऐतिहासिक संधी भारताला साद घालत आहे. भारतानं जोहान्सबर्ग मैदानावर आतापर्यंत चांगल प्रदर्शन करून दाखवलंय. भारतानं जोहान्सबर्ग मैदानावर भारतानं एकूण पाच कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारतानं दोन जिंकले आहेत. तर, तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. 


डीन एल्गरच्या नेतृत्वाखालील आफ्रिका संघाला यष्टिरक्षक फलंदाज िक्वटन डीकॉकची उणीव प्रकर्षांने जाणवेल. काही दिवसांपूर्वीच डीकॉकने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. 


संघ: 


दक्षिण आफ्रिकेचा संघ: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.


भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.