= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Sa 2nd Test Day 2 Live Score : दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला! भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. हा संपूर्ण दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावावर राहिला.
विशेषतः मुथुसामीने अप्रतिम खेळ करत भारतीय गोलंदाजांना चांगलंच हैराण केलं.
दक्षिण आफ्रिकेची पहिली खेळी 489 धावांवर संपल्यानंतर भारताने सावध सुरुवात केली.
स्टंप्सच्या वेळी भारताने पहिल्या डावात बिनबाद 9 धावा केल्या होत्या.
सध्या ते दक्षिण आफ्रिकेपेक्षा तब्बल 480 धावांनी पिछाडीवर आहेत.
यशस्वी जैस्वाल 7 आणि केएल राहुल 2 धावांवर नाबाद आहेत.
फिकट प्रकाशामुळे थोडासा अडथळा निर्माण झाला असला तरी दोन्ही सलामीवीरांनी संयमी खेळ करत कोणतीही विकेट न गमावता भारतीय डाव सावरला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Sa 2nd Test Day 2 Live Score : दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 400 धावांचा टप्पा गाठला दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 400 धावांचा टप्पा गाठला आहे.
त्यांच्या हातात अजूनही तीन विकेट शिल्लक आहेत.
सेनुरन मुथुसामी 86 धावांसह आणि मार्को जानसेन 48 धावांसह खेळत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Sa 2nd Test Day 2 Live Score : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला रडवलं, पहिल्या सत्रात मिळाली नाही एक पण विकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपले आहे.
पहिल्या सत्रात पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व होते आणि भारतीय गोलंदाजांना एकही यश मिळवता आले नाही.
मुथुस्वामी आणि व्हेरेन यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी सातव्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली.
ज्यामुळे चहापानाच्या ब्रेकपर्यंत पहिल्या डावात सहा बाद 316 धावा झाल्या.
मुथुस्वामी सध्या 56 धावांसह आणि व्हेरेन 38 धावांसह खेळत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Sa 2nd Test Day 2 Live Score : सकाळच्या सत्रात विकेट्ससाठी दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला रडवलं, धावसंख्या 300 धावा पार, जाणून घ्या अपडेट्स दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने विकेट्ससाठी टीम इंडियाला रडवलं आहे.
दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 300 धावा पार झाली अजून मुथुस्वामी आणि व्हेरेन यांनी सातव्या विकेटसाठी 60 पेक्षा जास्त धावा जोडल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 6 बाद 300 धावा केल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Sa 2nd Test Day 2 Live Score : पहिल्या दिवशी काय काय घडलं? भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला.
खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 6 बाद 247 धावा केल्या होत्या.
सेनुरन मुथुस्वामी 25 धावा आणि काइल व्हेरेन 1 धावा घेऊन खेळत होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Sa 2nd Test Day 2 Live Score : दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू गुवाहाटी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. सेनुरन मुथुसामी आणि काइल व्हेरेन क्रीजवर आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ind vs Sa 2nd Test Day 2 Live Score : पहिल्या सत्रात पावसामुळे येणार व्यत्यय? अॅक्युवेदरने सकाळी 10 : 30 वाजण्याच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पण सामना सुरू झाला आहेत आणि सूर्य चांगलाच चमकत आहे.