चेपॉक :भारतीय महिला क्रिकेट टीमनं (IND W vs SA W) अखेरच्या  टी 20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. भारतानं मंगळवारी झालेल्या टी 20 मॅचमध्ये 10 विकेटनं विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेनं जिंकली होती. तर, दुसरी मॅच पावसानं रद्द झाली होती. आज भारतानं 10 विकेटनं मॅच जिंकत मालिकेत बरोबरी केली. भारतासाठी आजची मॅच करो वा मरो होती.  हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर या दौऱ्यात वर्चस्व गाजवलं. आजच्या मॅचसह दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपला.  



भारतानं टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. वोल्वार्डट 9 धावांवर तर मारिजेन कॅप 10 धावांवर बाद झाल्या. दक्षिण आफ्रिकेनं पॉवर प्लेमध्ये 39 धावा केल्या होत्या. वोल्वार्डट आजच्या मॅचमधील कामगिरीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावा पूर्ण केला. श्रेयंका पाटीलनं वोल्वार्डटला बाद केलं आणि भारताला पहिलं यश मिळालं. यानंतर कॅपची विकेट वस्त्राकर हिनं घेतली. 






दक्षिण आफ्रिकेच्या 10 व्या ओव्हरपर्यंत 50 धावा पूर्ण झाल्या होत्या. यानंतर त्यांची गळती लागली आणि त्याचा डाव 84 धावांवर आटोपला. 



तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये भारतापुढं दक्षिण आफ्रिकेनं केवळ 85 धावांचं आव्हान ठेवलंहोतं. शेफाली वर्मानं 27 आणि स्मृती मानधना हिनं 57 धावा केल्या. दोघींनी अकराव्या ओव्हरमध्ये संघाला विजय मिळवून दिला. भारतानं  करो या मरो अशा स्थितीत असलेल्या मॅचमध्ये विजय मिळवून देत मालिकेत बरोबरी साधली. भारताकडून पूजा वस्त्राकरनं चार विकेट घेतल्या. राधा यादवनं तीन विकेट घेतल्या. पूजा वस्त्राकर हिची ही तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. दक्षिण आफ्रिकेकडून तेजमिन ब्रिटस हिनं 20 धावा केल्या. 


संबंधित बातम्या : 



Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह अन् स्मृती मानधनाला आयसीसीकडून मानाचं पान, मोठी अपडेट समोर, बुमराहनं मानले आभार