T20 World Cup 2021, IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज हाय-होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अभियानाची आज सुरुवात करत आहेत. आयसीसीच्या स्पर्धा वगळता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होत  नाही. विश्वचषकाच्या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान संघ तब्बल दोनवर्षांनी आमनेसामने उभे ठाकणारयत. त्यामुळं या सामन्याविषयी देशभरातल्या तमाम क्रिकेटरसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दोन्ही देशातील चाहते सोशल मीडियावर एकमेंकाना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये आता कंपन्यांनीही उडी घेतली आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या भारतातील झोमॅटो कंपनीनं पाकिस्तान संघाला डिवचणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटनंतर काही तासातचं त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. झोमॅटोला पाकिस्तानमधील Careem Pakistan या कंपनीनं प्रत्त्युत्तर दिलं आहे.


 झोमॅटो कंपनीनं काय ट्विट केलं होतं?
“प्रिय पाकिस्तान संघ, आज रात्रीसाठी तुम्हाला बर्गर आणि पिझ्झा हवा असेल तर थेट मॅसेज करा”


Careem Pakistan ने काय म्हटलं?
काळजी करु नका,  आम्ही पाकिस्तान संघाला मोफत पिझ्झा आणि बर्गर देत आहोत. आणि तुमच्यासाठी फँटेस्टिक चहा पाठवत आहोत. 





भारत आणि पाकिस्तानमधील या दोन्ही कंपन्यांनी आरोप-प्रत्यारोप करत सोशल मीडियावरील वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केलाय. झोमॅटो कंपनीनं 2019 विश्वचषकातील पाकिस्तानच्या समन्यासंदर्भात ट्विट केलेय. या सामन्यापूर्वी एका पाकिस्तानी चाहत्यांनी आपल्या संघातील काही खेळाडू सामन्यापूर्वी बर्गर, पिझ्झा खाण्यासाठी गेल्याचा दावा केला होता. तर Careem Pakistan यांनी कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा संदर्भ जोडला आहे.









दरम्यान, भारत आणि पाकिस्तन यांच्या तब्बल दोन वर्षानंतर सामना होत आहेत. विश्वचषकात आतापर्यंत भारताविरोधात पाकिस्तानला एकदाही विजय मिळवता आला नाही. सायंकाळी साडेसात वाजता हा महामुकाबला पाहायला मिळणार आहे.  पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 12 खेळाडूची घोषणा करत विराट कोहली अन् कंपनीला धक्का दिलाय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.


भारताविरोधात पाकिस्तानचा संघ (अंतिम 12) : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.


भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, रविचंद्रन अश्विन, राहुल चहर, इशान किशन, शार्दूल ठाकूर